मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: भाजीत दही टाकताना करु नका ही चुक, या कुकिंग हॅक्स करतील मदत

Cooking Tips: भाजीत दही टाकताना करु नका ही चुक, या कुकिंग हॅक्स करतील मदत

Dec 31, 2022, 01:41 PM IST

    • जेवण स्वादिष्ट होण्यासाठी फक्त मसाले टाकून फायदा नाही, तर अनेक वेळा ते करण्याची पद्धत देखील महत्त्वाची असते. भाजी असो वा पराठा, त्याची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही हे काही हॅक्स फॉलो करु शकता.
कुकिंग टिप्स

जेवण स्वादिष्ट होण्यासाठी फक्त मसाले टाकून फायदा नाही, तर अनेक वेळा ते करण्याची पद्धत देखील महत्त्वाची असते. भाजी असो वा पराठा, त्याची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही हे काही हॅक्स फॉलो करु शकता.

    • जेवण स्वादिष्ट होण्यासाठी फक्त मसाले टाकून फायदा नाही, तर अनेक वेळा ते करण्याची पद्धत देखील महत्त्वाची असते. भाजी असो वा पराठा, त्याची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही हे काही हॅक्स फॉलो करु शकता.

Smart Cooking Hacks: एक प्रकारची भाजी खावून नेहमीच कंटाळा येतो. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळा रेस्टॉरंट सारखी ग्रेव्ही बनवण्यासाठी त्यात दही टाकले जाते. त्याची पद्धत जर चुकली तर भाजीची चव बदलू शकतो. तसेच अनेक पदार्थ बनवताना छोटीशी चुक देखील पदार्थाची चव खराब करु शकते. त्यामुळे काही टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे. जाणून घ्या अशाच काही उपयुक्त कुकिंग टिप्स.

ट्रेंडिंग न्यूज

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

भाजीमध्ये दही घालायचे असेल तर

अनेक जण भाजीची चव वाढवण्यासाठी त्यात दही घालतात. तुम्ही भाजीत दही घातल्यास लगेच मीठ घालू नका. कारण ते दही आणि भाजीची चव खराब करते. अशा स्थितीत भाजीला उकळी येऊ लागली की त्यात मीठ घालावे.

मुंग्यांपासून साखरेचे संरक्षण कसे करावे

मुंग्यांपासून साखरेचे रक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही ज्या डब्यात साखर ठेवता त्यात ३-४ लवंगा ठेवा. यामुळे मुंग्या साखरेत अजिबात येणार नाहीत.

सॉफ्ट इडली बनवण्याची ट्रिक

जर तुम्हाला इडली मऊ बनवायची असेल तर इडलीमध्ये साबुदाणा आणि उडीद डाळ घालून मऊ आणि स्पंजी बनवू शकता. त्यामुळे इडलीची चवही वाढते.

आलू पराठा बनवा चविष्ट

आलू पराठा टेस्टी बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बटाट्याच्या मिश्रणात थोडी कसुरी मेथी टाकणे. त्यामुळे बटाट्याचे पराठे आणखीनच स्वादिष्ट होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या