मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  या अमेझिंग कुकिंग टिप्स फॉलो करा आणि झटपट बनवा स्वादिष्ट जेवण

या अमेझिंग कुकिंग टिप्स फॉलो करा आणि झटपट बनवा स्वादिष्ट जेवण

Dec 12, 2022, 01:17 PM IST

    • झटपट आणि टेस्टी जेवण बनवण्यासाठी काही कुकिंग टिप्स फॉलो करणे खूप महत्त्वाचे असते. हे फक्त तुमचे जेवण स्वादिष्ट बनवत नाही तर तुमचा वेळ देखील वाचवतात.
कुकिंग टिप्स

झटपट आणि टेस्टी जेवण बनवण्यासाठी काही कुकिंग टिप्स फॉलो करणे खूप महत्त्वाचे असते. हे फक्त तुमचे जेवण स्वादिष्ट बनवत नाही तर तुमचा वेळ देखील वाचवतात.

    • झटपट आणि टेस्टी जेवण बनवण्यासाठी काही कुकिंग टिप्स फॉलो करणे खूप महत्त्वाचे असते. हे फक्त तुमचे जेवण स्वादिष्ट बनवत नाही तर तुमचा वेळ देखील वाचवतात.

Amazing Cooking Tips: ग्रेव्ही अधिक चविष्ट आणि घट्ट होण्यासाठी दहीचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की ग्रेव्हीमध्ये दही घालण्याची एक पद्धत आहे. ग्रेव्हीमध्ये दोन चमचे दही टाका. नंतर ते चांगले मिक्स करत राहा, यामुळे ग्रेव्हीमध्ये दही चांगले मिक्स होईल. स्वयंपाक करताना अशाच अनेक गोष्टी तुमच्या उपयोगी पडतील ज्या तुमचे जेवण आणखी टेस्टी बनवेल. चला जाणून घेऊया काही कुकिंग टिप्स.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवा

जर तुम्हाला घाई असेल तर तांदूळ आणि डाळ लवकर शिजण्यासाठी धुवून थोडा वेळ भिजवून ठेवा. यामुळे ते लवकर शिजेल.

वरणात मीठ कधी घालायचे

वरणात मीठ घालण्याचा उत्तम मार्ग म्हणजे डाळ पूर्ण शिजल्यावरच मीठ घालणे. याशिवाय डाळ शिजवताना त्यात हळद नक्कीच घालावी. त्यामुळे वरणाची चव वाढते.

राजमा, छोले आणि मटर उकळण्याची योग्य पद्धत

राजमा, छोले आणि वाटाणे लवकर शिजवण्यासाठी ते भिजवताना त्यात बेकिंग सोडा घाला. त्यामुळे या गोष्टी शिजायला कमी वेळ लागेल.

पनीर मऊ कसे ठेवावे

पनीर मऊ ठेवण्यासाठी ते कोमट पाण्यात ठेवा. या पाण्यात चिमूटभर मीठही टाका. यामुळे पनीर मऊ राहील आणि त्यावर जाड थर तयार होणार नाही. तुम्हाला पनीर पूर्वीसारखे ताजे मिळेल.

टोमॅटो प्युरी कशी बनवायची

टोमॅटो प्युरी बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे टोमॅटो थोडे मीठ घालून उकळणे आणि नंतर थंड करून मिक्सरमध्ये बारीक करणे. यानंतर हवाबंद डब्यात टाकून ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या