मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Onion Cheese Sandwich Recipe: जास्त कष्ट न करता नाश्त्यात बनवा कांदा चीज सँडविच, रेसिपी आहे सोपी!

Onion Cheese Sandwich Recipe: जास्त कष्ट न करता नाश्त्यात बनवा कांदा चीज सँडविच, रेसिपी आहे सोपी!

Jan 16, 2023, 09:26 AM IST

    • Breakfast Recipe: नाश्ता बनवण्यासाठी जास्त कष्ट करू इच्छित नसाल, तर तुम्ही कांदा चीज सँडविचची सोपी रेसिपी करून पाहू शकता. 
सँडविच रेसिपी (Pixabay )

Breakfast Recipe: नाश्ता बनवण्यासाठी जास्त कष्ट करू इच्छित नसाल, तर तुम्ही कांदा चीज सँडविचची सोपी रेसिपी करून पाहू शकता.

    • Breakfast Recipe: नाश्ता बनवण्यासाठी जास्त कष्ट करू इच्छित नसाल, तर तुम्ही कांदा चीज सँडविचची सोपी रेसिपी करून पाहू शकता. 

सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचे हा रोजचाच प्रश्न असतो. अशा पदार्थाच्या शोधात सगळेच असतात ज्याने पोट भरेल, झटपट तयार होईल, हेल्दी आणि चविष्ट असेल. अनेकजण झोपेतून उठल्यावर थेट किचन असा प्रवास करतात. अनेकदा वेळेअभावी बरेच लोक नाश्ता न करताच घराबाहेर पडतात. जर तुम्ही देखील या लोकांसारखे असाल किंवा तुम्ही एकटे राहत असाल आणि नाश्ता बनवण्यासाठी जास्त कष्ट करू इच्छित नसाल, तर तुम्ही आज एक मजेदार आणि सोपी रेसिपी करून पाहू शकता. ही आहे कांदा चीज सँडविचची रेसिपी. एकदा हे सँडविच खाल्ल्यानंतर तुम्ही त्याचे चाहते व्हाल. बनवायला खूप सोपे आहे. चहाचे घोट घेत या सँडविचची मजा अजूनच वाढते. हे सँडविच बनवण्यासाठी काय आवश्यक आहे ते प्रथम जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

Beauty Trend: तांदूळ आणि त्याच्या पाण्यापासून बनवलेले हे फेस पॅक होत आहे व्हायरल, तुम्ही ट्राय केले का?

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

कांदा चीज सँडविच बनवण्यासाठी साहित्य

१ कांदा

४ चीज स्लाइस

४ ब्रेडचे तुकडे

मीठ

१/४ टीस्पून लाल तिखट

तूप किंवा बटर

कांदा चीज सँडविच कसं बनवायचं?

कांदा चीज सँडविच बनवण्यासाठी प्रथम कांदा बारीक चिरून किंवा किसून घ्या.

यानंतर ब्रेड स्लाइसच्या एका बाजूला तूप किंवा बटर लावा.

त्यावर कांदा ठेवा.

आता त्यावर चीज स्लाईट किंवा किसलेले चीज ठेवा.

आता त्यावर मीठ आणि लाल तिखट पसरवा.

ते बनवण्यासाठी तुम्ही ग्रिलर किंवा मायक्रोवेव्ह वापरू शकता. येथे आम्ही तुम्हाला तव्यावर सँडविच बनवण्याची पद्धत सांगत आहोत.

दुसर्‍या ब्रेड स्लाइसने झाकून ठेवा. सँडविचला बटर लावून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

काही वेळात कुरकुरीत सँडविच तयार होईल.

तुम्ही केचप सोबत सर्व्ह करू शकता. यासोबत हिरवी चटणीही खाऊ शकता.

विभाग

पुढील बातम्या