मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Medu Vada Recipe: रविवारच्या नाश्त्यासाठी बनवा मेदू वडा! सॉफ्ट आणि फ्लफी होण्यासाठी फॉलो करा टिप्स

Medu Vada Recipe: रविवारच्या नाश्त्यासाठी बनवा मेदू वडा! सॉफ्ट आणि फ्लफी होण्यासाठी फॉलो करा टिप्स

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 15, 2023 09:45 AM IST

Breakfast Recipe: मेदू वडा हा दक्षिणेतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध पदार्थ आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही सांभार, चटणी, दही यासारख्या कोणत्याही गोष्टीसोबत खाऊ शकता.

ब्रेकफास्ट रेसिपी
ब्रेकफास्ट रेसिपी (Freepik )

South Indian Food: मेदू वडा हा उडीद डाळीपासून बनवलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे. हे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ आहे आणि अगदी डोनटसारखे दिसते. हे दक्षिण भारतीय आणि श्रीलंकन ​​तमिळ पाककृतींमध्ये खूप लोकप्रिय आहे जे सहसा नाश्ता किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून खाल्ले जाते. हा दक्षिण भारतातील मुख्य सण पोंगलच्या पारंपारिक पदार्थांपैकी एक आहे. या सणाला मेंदू वडा नक्कीच बनवला जातो. चला मेदू वडा बनवण्यासाची पद्धत जाणून घेऊया.

साहित्य:

२ कप उडीद डाळ, रात्रभर भिजत ठेवलेली

२-४ हिरव्या मिरच्या, चिरून

२ चमचे कोथिंबीर, चिरलेली

१ टेस्पून आले, बारीक चिरून

कढीपत्ता, चिरून

१/४ कप ताजे नारळाचे तुकडे

५-१० काळी मिरी ठेचून

चवीनुसार मीठ,

तळण्यासाठी तेल

पिठाला बारीक करण्यासाठी आवश्यक असल्यास थोडेसे पाणी

मेदू वडा कसा बनवायचा?

> मेंदू वडा बनवण्यासाठी प्रथम २ कप उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुस-या दिवशी डाळ चांगला फुलला की, मग पाणी काढून मिक्सरमध्ये जाडसर पीठ बनवा.

> मिक्सरमध्ये डाळ टाकताना पाण्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या, जर पाणी जास्त असेल तर वडा बनवताना अडचण येऊ शकते.

> म्हणूनच डाळीत फक्त २-३ चमचे पाणी घाला.

> एका प्लेटमध्ये पीठ काढून घ्या आणि चांगल ढवळत राहा जेणेकरून त्यात हवा भरेल.

> फेटताना मधे १ चमचा पाणी घालत रहा. जेव्हा तुम्हाला वाटेल की डाळीचे पीठ पांढरे झाले आहे आणि पिठाचे प्रमाण देखील वाढले आहे, तेव्हा थांबा.

> फेटल्यानंतर, एक चमचा पिठ पाण्यात टाका आणि ते पाण्याच्या वर तरंगते का ते पहा, म्हणजे तुमची पिठ पूर्णपणे तयार आहे.

> आता त्यात बारीक चिरलेला नारळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, ५-१० ठेचलेली काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिसळा.

> आता एका कढईत तेल गरम करून हातावर चमचाभर पिठ घेऊन त्याचा जाड गोळा बनवा, बोटाच्या साहाय्याने मधोमध छिद्र करा आणि वडा तेलात सोडा. > थोड्याच वेळात वाड्याला सोनेरी रंग येऊ लागेल.

> वडा कुरकुरीत होई पर्यंत तळा.

WhatsApp channel

विभाग