मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bitter Gourd: लंच मध्ये अशा पद्धतीने बनवा कारल्याची भाजी, सगळे खातील आवडीने

Bitter Gourd: लंच मध्ये अशा पद्धतीने बनवा कारल्याची भाजी, सगळे खातील आवडीने

Apr 18, 2023, 10:57 AM IST

    • Karela Bhaji Recipe: कारले आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याच्या कडू चवीमुळे लहान मुले आणि मोठ्यांनाही ती खायला आवडत नाही. कारले मुलांना खायला द्यायचे असेल तर ते बेसनामध्ये मिक्स करुन बनवा. पहा ही रेसिपी.
कारल्याची भाजी

Karela Bhaji Recipe: कारले आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याच्या कडू चवीमुळे लहान मुले आणि मोठ्यांनाही ती खायला आवडत नाही. कारले मुलांना खायला द्यायचे असेल तर ते बेसनामध्ये मिक्स करुन बनवा. पहा ही रेसिपी.

    • Karela Bhaji Recipe: कारले आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याच्या कडू चवीमुळे लहान मुले आणि मोठ्यांनाही ती खायला आवडत नाही. कारले मुलांना खायला द्यायचे असेल तर ते बेसनामध्ये मिक्स करुन बनवा. पहा ही रेसिपी.

Bitter Gourd Bhaji Recipe without Bitterness: कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण त्याच्या कडू चवीमुळे लहान मुले आणि मोठे सगळेच ते खायला कंटाळा करतात. कधी घरी कारल्याची भाजी बनवली तर मोठ्या कष्टाने ती सगळे खातात. दुसरीकडे मुले लगेच पळ काढतात. तुमच्या घरातही कारल्याची भाजी खायला सगळे नखरे करत असतील तर तुम्ही बेसन घालून ती बनवा. बेसनाच्या पीठाने बनवलेली कारल्याची भाजी मोठ्यांसह लहान मुलांनाही आवडेल. चला तर मग जाणून घेऊया बेसन घालून कारल्याची भाजी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

Jamun Sarbat: उन्हाचा प्रभाव कमी करते जामुन शरबत, नोट करा कुणाल कपूरची ही रेसिपी

बेसन घालून कारल्याची भाजीसाठी साहित्य

- २५० ग्रॅम कारले

- बेसन ३ चमचे

- टोमॅटो २

- हिरवी मिरची

- बडीशेप पावडर १ टीस्पून

- कसूरी मेथी

- लाल तिखट १ टीस्पून

- हळद १ टीस्पून

- धने पावडर १ टीस्पून

- आमचूर पावडर अर्धा चमचा

- तेल २ चमचे

- जिरे

- हिंग चिमुटभर

- मीठ चवीनुसार

Thecha recipe: हिरव्या मिरचीचा ठेचा वाढवेल जेवणाची चव, २ मिनिटात करा तयार

बेसन घालून कारल्याची भाजी बनवण्याची पद्धत

प्रथम कारले उकळून घ्या. यासाठी कारले चांगले धुवून वाळवावेत. नंतर त्यांचे देठ कापून गोल आकारात कापून घ्या. खोल तळाच्या भांड्यात कारले ठेवा आणि अंदाजाने पाणी टाका. सोबत एक चमचा मीठ आणि हळद घाला. पाणी उकळायला लागल्यावर त्यात कारले टाका आणि चार ते पाच मिनिटे शिजवा. मध्ये मध्ये शिजले की नाही ते तपासा. नीट शिजले नसेल तर अजून थोडा वेळ शिजवून गॅस बंद करा. आता हे शिजलेले कारल्यातून पाणी गाळून घ्या.

Sandwich Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ग्रील्ड चीज सँडविच, मुले होतील खुश

एका प्लेटमध्ये ३ चमचे बेसन घ्या. त्यात हळद, बडीशेप पावडर, धने पावडर आणि लाल तिखट, आमचुर पावडर आणि मीठ घाला. मसाले चांगले मिक्स करावे आणि उकडलेले कारले घाला. बेसनाचा मसाला कारल्यावर सर्वत्र कोट करा. कढईत तेल गरम करून प्रत्येक कारल्याचा काप गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. बेसनासोबत कारले तयार आहे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात वरण भातासोबत सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या