मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Falooda Recipe: घरच्या घरी फालुदा बनवणे आहे सोपे, कुल्फीची मजा द्विगुणीत करेल ही रेसिपी

Falooda Recipe: घरच्या घरी फालुदा बनवणे आहे सोपे, कुल्फीची मजा द्विगुणीत करेल ही रेसिपी

Apr 23, 2024, 11:44 PM IST

    • Summer Special Recipe: अनेक लोकांना घरी फालुदा बनवणे अवघड वाटते. पण तुम्ही ते सहज बनवू शकता. तुम्हाला घरी फालुदा बनवायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता.
Falooda Recipe: घरच्या घरी फालुदा बनवणे आहे सोपे, कुल्फीची मजा द्विगुणीत करेल ही रेसिपी

Summer Special Recipe: अनेक लोकांना घरी फालुदा बनवणे अवघड वाटते. पण तुम्ही ते सहज बनवू शकता. तुम्हाला घरी फालुदा बनवायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता.

    • Summer Special Recipe: अनेक लोकांना घरी फालुदा बनवणे अवघड वाटते. पण तुम्ही ते सहज बनवू शकता. तुम्हाला घरी फालुदा बनवायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता.

Falooda Recipe: उन्हाळ्यात आईस्क्रीम, कुल्फी, फालुदा खायला सगळ्यांना आवडते. आईस्क्रीम, कुल्फी तर घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. पण अनेक लोकांना घरी फालुदा बनवणे अवघड काम वाटते. तुम्हाला घरी फालुदा बनवायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट फालुदा बनवू शकता. हे तुमच्या कुल्फीची चव आणखी वाढवेल. चला तर मग जाणून घ्या सोप्या पद्धतीने फालुदा कसा बनवायचा.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

फालुदा बनवण्यासाठी साहित्य

- १ कप कॉर्न स्टार्च

- गुलाब जल

- १ टीस्पून साखर

फालुदा बनवण्याची पद्धत

फालुदा बनवण्यासाठी एका भांड्यात कॉर्न स्टार्च घ्या. आता त्यात थोडे गुलाबजल आणि कॉर्न स्टार्च नुसार एक किंवा दोन चमचे साखर घाला. पाणी घालून पातळ द्रावण तयार करा. हे बॅटर तयार करताना त्यात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. ते सतत चमच्याने ढवळून स्मूथ बॅटर बनवा. आता एक नॉनस्टिक पॅन घेऊन गरम करा. आता त्यात कॉर्न स्टार्चचे तयार केलेले बॅटर टाका. बॅटर खूप घट्ट आणि स्टिकी होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. शिजल्यानंतर कॉर्न स्टार्च खूप घट्ट आणि चिकट होईल आणि पारदर्शक दिसू लागेल. आता फालुदा बनवण्यासाठी शेव किंवा शेवया बनवणारा साचा घ्या. त्यात कॉर्न स्टार्चचे गरम बॅटर टाका. लक्षात ठेवा की ते खूप गरम असावे अन्यथा फालुदा नीट बनणार नाही. 

आता एका खोलगट भांड्यात बर्फाचे थंड पाणी घ्या. गरम कॉर्न स्टार्चचे बॅटर शेवया मशिनमध्ये फालुदा बनवा. हे थेट थंड पाण्यात बनवा. थंड पाण्यातून फालुदा काढा आणि कुल्फीसोबत सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या