मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Special Recipe: उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा हे खास ड्रिंक्स, टेस्ट सोबत मिळेल झटपट एनर्जी

Summer Special Recipe: उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा हे खास ड्रिंक्स, टेस्ट सोबत मिळेल झटपट एनर्जी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 23, 2024 09:46 PM IST

Summer Drinks: उन्हाळ्यात आंबा खायला सर्वांना आवडते. तुम्ही आंब्यापासून विविध ड्रिंक्स बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

Summer Special Recipe: उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा हे खास ड्रिंक्स, टेस्ट सोबत मिळेल झटपट एनर्जी
Summer Special Recipe: उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा हे खास ड्रिंक्स, टेस्ट सोबत मिळेल झटपट एनर्जी (unsplash)

Mango Drinks Recipe: उन्हाळ्यात फक्त डिहायड्रेशन नाही तर एनर्जी आणि शरीर थंड होण्यासाठी देखील विविध ड्रिंक्स घेतले जातात.या काळात पुरेसे पाणी पिण्यासोबतच काही ड्रिंक्सचा आहारात समावेश फायदेशीर आहे. या दिवसांमध्ये टरबूज, आंबा हे फळं आवडीने खाल्ले जातात. तुम्ही आंब्याचे रस सोबतच काही ड्रिंक्स ट्राय करायचे असतील हे रेसिपी तुमच्यासाठी आहेत. तुम्ही आंब्यापासून विविध ड्रिंक्स बनवू शकता. हे तुम्हाला फक्त चवच देणार नाही तर एनर्जी सुद्धा देतात. चला तर मग जाणून घ्या या स्पेशल ड्रिंक्सची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

मँगो लस्सी

तुम्ही घरी सहज मँगो लस्सी बनवू शकता. यासाठी तुम्हाला आंबा, साखर, दही, बर्फाचे तुकडे आणि बदाम, पिस्ता, काजू लागेल. हे बनवण्यासाठी आंब्याचे छोटे तुकडे करा. नंतर ब्लेंडरमध्ये आंबा, साखर, दही, बर्फाचे तुकडे घालून चांगले ब्लेंड करा. नंतर ते एका ग्लासमध्ये काढून घ्या. सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर चिरलेले बदाम, पिस्ता, काजू घालून सजवा.

मँगो मोइतो

तुम्ही मँगो मोइतो देखील बनवू शकता. उन्हाळ्यात मँगो मोइतो प्यायला चांगले लागते. ज्या लोकांना सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स प्यायला आवडते त्यांच्यासाठी मँगो मोइतो उत्तम ड्रिंक आहे. हे बनवण्यासाठी आंब्याचा रस घ्या आणि त्यात पुदिन्याची पाने, सोडा आणि बर्फ घाला. आता हे पेय प्या.

मँगो शेक

तुम्ही आंब्यापासून मँगो शेक देखील बनवू शकता. यासाठी आंब्याचे तुकडे ब्लेंडरमध्ये टाकून त्यात दूध घालून ब्लेंड करा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यात थोडी साखर देखील घालू शकता. त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि बदामाने सजवून सर्व्ह करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग