Dal Pakwan Recipe: झटपट बनवा प्रसिद्ध सिंधी डिश दाल पकवान, संडे ब्रंचसाठी परफेक्ट आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dal Pakwan Recipe: झटपट बनवा प्रसिद्ध सिंधी डिश दाल पकवान, संडे ब्रंचसाठी परफेक्ट आहे रेसिपी

Dal Pakwan Recipe: झटपट बनवा प्रसिद्ध सिंधी डिश दाल पकवान, संडे ब्रंचसाठी परफेक्ट आहे रेसिपी

Published Apr 21, 2024 01:09 PM IST

Sunday Brunch Recipe: रविवारच्या दिवशी स्पेशल काहीतरी खायची इच्छा असेल तर तुम्ही ही सिंधी डिश बनवू शकता. दाल पकवान बनवायला सोपे आहे. पाहा रेसिपी.

Dal Pakwan Recipe: झटपट बनवा प्रसिद्ध सिंधी डिश दाल पकवान, संडे ब्रंचसाठी परफेक्ट आहे रेसिपी
Dal Pakwan Recipe: झटपट बनवा प्रसिद्ध सिंधी डिश दाल पकवान, संडे ब्रंचसाठी परफेक्ट आहे रेसिपी (freepik)

Sindhi Dish Dal Pakwan Recipe: रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक लोक ब्रेकफास्ट आणि लंच एकत्रच करतात. तुम्ही सुद्धा आज ब्रंच करायचा विचार करत असाल आणि काय बनवायचा हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही दाल पकवान बनवू शकता. ही सिंधी डिश खूप प्रसिद्ध आहे. शिवाय ही खायला टेस्टी आणि बनवायला सोपी सुद्धा आहे. तुमच्या संडे ब्रंचसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या प्रसिद्ध सिंधी डिश दाल पकवानची रेसिपी.

दाल पकवान बनवण्यासाठी साहित्य

दाल बनवण्यासाठी साहित्य

- हरभरा डाळ एक कप

- बारीक चिरलेला टोमॅटो

- १ कांदा बारीक चिरलेला

- लाल तिखट

- एक चमचा धने पावडर

- एक चमचा गरम मसाला

- मोहरी

- जिरे

- हळद

- चाट मसाला

- लिंबू

- चिंच

- पाणी

- तेल

- मीठ

पकवान बनवण्यासाठी साहित्य

- २ कप मैदा

- १ चमचा ओवा,

- अर्धा चमचा तेल

- कोमट पाणी

दाल पकवानची रेसिपी

दाल बनवण्याची पद्धत

दाल पकवान बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळ तयार करा. डाळ बनवण्यासाठी हरभरा डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा. नंतर प्रेशर कुकरमध्ये पाणी, हळद आणि मीठ एकत्र करून डाळ शिजवा. कुकरमध्ये ५-६ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. शिटी थांबताच कुकरचे झाकण उघडा. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे तडतडून घ्या. आता त्यात टोमॅटो घालून शिजवा. नंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला आणि धने पूड घालून शिजवा. एक मिनिट परतून झाल्यावर त्यात शिजलेली हरभरा डाळ घाला. हे सर्व चांगले मिक्स करा आणि दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर शिजवा. फक्त डाळ तयार आहे.

पकवान बनवण्याची पद्धत 

पकवान बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात मैद्या घ्या. त्यात मीठ, ओवा, तेल आणि कोमट पाणी घाला. सर्व साहित्य मैद्यामध्ये मिसळा आणि घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ अर्धा तास बाजूला ठेवा. साधारण अर्ध्या तासानंतर हे पीठ घेऊन त्याचा गोळा तयार करून लाटून घ्या. आता या लाटलेल्या पुरीवर काट्याच्या साहाय्याने टोचून घ्या. जेणेकरून ते तळताना फुगणार नाहीत. कढईत तेल गरम करा. या पुऱ्या गरम तेलात टाकून तळून घ्या. हे क्रिस्पी होतील. सोनेरी होईपर्यंत तळा आणि नंतर प्लेटमध्ये काढा. आता या तयार पकवानवर डाळ टाका, गरम चाट मसाला, कांदा, लिंबू घालून सर्व्ह करा.

Whats_app_banner