मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Lassi: उन्हाळ्यात फक्त चवच नाही तर आरोग्याची काळजी घेते मँगो लस्सी, नोट करा पंजाबी रेसिपी

Mango Lassi: उन्हाळ्यात फक्त चवच नाही तर आरोग्याची काळजी घेते मँगो लस्सी, नोट करा पंजाबी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 21, 2024 11:43 PM IST

Summer Special Drink Recipe: उन्हाळ्याच्या स्पेशल ड्रिंकमध्ये पंजाबी मँगो लस्सीचाही समावेश आहे. दही आणि आंब्याच्या मिश्रणातून बनवलेले हे पेय चवीसोबतच उष्णतेपासूनही आराम देते. चला जाणून घ्या मँगो लस्सीची रेसिपी

Mango Lassi: उन्हाळ्यात फक्त चवच नाही तर आरोग्याची काळजी घेते मँगो लस्सी, नोट करा पंजाबी रेसिपी
Mango Lassi: उन्हाळ्यात फक्त चवच नाही तर आरोग्याची काळजी घेते मँगो लस्सी, नोट करा पंजाबी रेसिपी (unsplash)

Panjabi Mango Lassi Recipe: उन्हाळा सुरू होताच लोकांना अशा गोष्टींचा आहारात समावेश करायला आवडते, ज्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच पण शरीर हायड्रेटही राहते. पंजाबी मँगो लस्सीचे नावही अशाच एका उन्हाळी स्पेशल ड्रिंकमध्ये समाविष्ट आहे. दही आणि आंब्याच्या बनवलेले हे पेय चवीसोबतच उष्णतेपासूनही आराम देते. उन्हाळ्यात याच्या सेवनाने त्वचेचेच नव्हे तर केसांचेही सौंदर्य टिकून राहण्यास मदत होते. तुम्हालाही मँगो लस्सी प्यायला आवडत असेल पण आजपर्यंत घरी बनवण्याचा प्रयत्न केला नसेल तर काळजी करू नका. चव आणि आरोग्याचा डबल डोस मिळवण्यासाठी मँगो लस्सी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

मँगो लस्सी बनवण्यासाठी साहित्य

- ४ आंबे

- २ कप दही

- १ टीस्पून टुटी फ्रुटी (ऐच्छिक)

- ५ टीस्पून साखर

- १/४ टीस्पून वेलची पावडर

- ३-४ पुदिन्याची पाने

मँगो लस्सी बनवण्याची पद्धत

मँगो लस्सी बनवण्यासाठी आधी आंबा सोलून त्याचा गर एका भांड्यात काढून घ्या. यानंतर आंब्याचा गर ब्लेंडरमध्ये दही, साखर आणि वेलची पावडरसह आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. लस्सी तीन-चार वेळा ब्लेंड केल्यानंतर ब्लेंडरमधून लस्सी काढून वेगळ्या भांड्यात ठेवा. आता ही लस्सी थंड होण्यासाठी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. लस्सी थंड झाल्यावर सर्व्हिंग ग्लासमध्ये घाला आणि टूटी फ्रूटी आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा. ही मँगो लस्सी प्यायल्यानंतर तुम्हाला दिवसभर ताजेपणा जाणवेल.

WhatsApp channel

विभाग