मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  नवरात्र उपवासाला बनवा भगरची खीर, फॉलो करा ही सोपी रेसिपी

नवरात्र उपवासाला बनवा भगरची खीर, फॉलो करा ही सोपी रेसिपी

Mar 23, 2023, 02:18 PM IST

  • Chaitra Navratri Vrat: जर तुम्ही चैत्र नवरात्रीत मातेला प्रसन्न करण्यासाठी उपवास केला असेल तर तुम्ही फराळासाठी भगरची खीर बनवू शकता. जाणून घेऊया काय आहे त्याची रेसिपी.

भगरची खीर

Chaitra Navratri Vrat: जर तुम्ही चैत्र नवरात्रीत मातेला प्रसन्न करण्यासाठी उपवास केला असेल तर तुम्ही फराळासाठी भगरची खीर बनवू शकता. जाणून घेऊया काय आहे त्याची रेसिपी.

  • Chaitra Navratri Vrat: जर तुम्ही चैत्र नवरात्रीत मातेला प्रसन्न करण्यासाठी उपवास केला असेल तर तुम्ही फराळासाठी भगरची खीर बनवू शकता. जाणून घेऊया काय आहे त्याची रेसिपी.

Bhagarchi Kheer Recipe: कालपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त नऊ दिवस उपवास करतात. दरवर्षी चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिप्रदा तिथीपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. नवरात्रीच्या उपवासात फराळाचे देखील अनेक नियम सांगण्यात आले आहेत. या दरम्यान उपवास करणाऱ्या व्यक्तीला अनेक गोष्टींचे पालन करावे लागते. मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्हीही यावर्षी उपवास केला असेल तर फराळासाठी तुम्ही भगरची खीर बनवू शकता. जाणून घेऊया त्याची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

भगरचे फायदे

- भगर किंवा वरईच्या भातामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असल्याने ते लवकर पचतात.

- भगरचा समावेश कमी ग्लायसेमिक अन्नामध्ये होतो. त्यामुळे हृदयाच्या रुग्णांसोबत मधुमेहाचे रुग्णही याचे सेवन करू शकतात.

- भगरची खीर पोषक तत्वांनी भरलेली असते.

भगरची खीर बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- १/२ कप भगर

- १ लिटर दूध

- १/२ कप साखर

- ८ ते १० काजू

- काही बेदाणे

- १०-१२ बदाम

- २ छोटी वेलची

भगरची खीर बनवण्याची पद्धत

भगरची खीर बनवण्यासाठी प्रथम भगर धुवून अर्धा तास भिजत ठेवा. यानंतर भांड्यात दूध गरम करा. दूध केल्यानंतर दुधात भगर मिक्स करा आणि सतत ढवळत राहा, जेणेकरून खीर भांड्याच्या तळाशी चिकटणार नाही. भगर मऊ झाल्यावर खीरमध्ये ड्रायफ्रुट्स आणि वेलची घालून मिक्स करा. भगर दुधात चांगले विरघळल्यानंतर खीरमध्ये साखर घालून मिक्स करावे. तुमची चविष्ट भगरची खीर तयार आहे. थंड झाल्यावर खाल्ल्याने चव दुप्पट होते.

विभाग

पुढील बातम्या