मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Banana Milkshake Recipe: वजन वाढवायचं आहे? प्या केळीचा मिल्क शेक, जाणून घ्या रेसिपी

Banana Milkshake Recipe: वजन वाढवायचं आहे? प्या केळीचा मिल्क शेक, जाणून घ्या रेसिपी

Apr 26, 2024, 09:24 AM IST

    • Breakfast Recipe: तुमचे वजन वाढत नसेल तर सकाळच्या नाश्त्यात केळीच्या शेकचा समावेश करा. काही दिवस प्यायल्यानंतर तुमचे वजन वाढू लागते. ते कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.
how to make banana milkshake (freepik)

Breakfast Recipe: तुमचे वजन वाढत नसेल तर सकाळच्या नाश्त्यात केळीच्या शेकचा समावेश करा. काही दिवस प्यायल्यानंतर तुमचे वजन वाढू लागते. ते कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

    • Breakfast Recipe: तुमचे वजन वाढत नसेल तर सकाळच्या नाश्त्यात केळीच्या शेकचा समावेश करा. काही दिवस प्यायल्यानंतर तुमचे वजन वाढू लागते. ते कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

Weight Gain Breakfast Recipe: एकीकडे देशात आणि जगात लोक वाढत्या लठ्ठपणाने हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे काहींचं मात्र वजन वाढत नाहीये. अनेक वजनाने कमी असलेले लोकांनी कितीही खाल्ले तरी त्यांचे वजन वाढत नाही. बारीक शरीरामुळे लोकांना खूप अशक्त वाटते. याशिवाय बारीकपणामुळे तुमचं व्यक्तिमत्व खराब होऊ शकतं, अशा वेळी तुम्हीही बारीकपणाचे शिकार असाल तर वजन वाढवण्यासाठी केळीचे सेवन करा सुरू करा. लक्षात घ्या की केळी खाल्ल्याने तुमचे वजन हळूहळू वाढेल. पण जर तुम्ही त्याचा मिल्क शेक बनवून प्यायलात तर तुमचे वजन वेगाने वाढेल. आता तुम्ही विचार करत असाल की वजन वाढवण्यासाठी केळीचा शेक कसा बनवायचा, चला तर मग आम्ही तुम्हाला सांगूया घरी उत्तम प्रोटीन असलेला केळीचा मिल्क शेक कसा बनवायचा?

ट्रेंडिंग न्यूज

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

लागणारे साहित्य

२ केळी, अर्धा कप दूध, १ चमचा मध, ४ बदाम, ४ काजू, अर्धा चमचा भोपळ्याच्या बिया

Cold Coffee Recipe: मलईदार, फेसाळलेली कोल्ड कॉफी मशीनशिवाय घरीच बनवा, नोट करा रेसिपी!

जाणून घ्या कृती

केळ्याचा शेक हेल्दी बनवण्यासाठी केळीची साल काढून त्याचे तुकडे करा. आता केळी ग्राइंडरच्या भांड्यात ठेवा. या बरणीत अर्धा कप दूध टाका. आता हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून अतिशय स्मूद पेस्ट बनवा. आता हा शेक एका ग्लासमध्ये काढा. तुम्हाला हवे असल्यास केळीच्या मिल्क शेकला गार्निश करण्यासाठी ३ ते ४ बर्फाचे तुकडे टाका. केळीच्या शेकचे रोज नट्ससोबत सेवन केल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढते.

Egg Paratha Recipe: रेगुलर पराठ्याऐवजी नाश्त्यात बनवा अंड्याचा पराठा, नोट करा रेसिपी!

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही केळीचा मिल्क शेक दुसऱ्या पद्धतीनेही बनवू शकता. जर तुम्हाला तुमचे वजन लवकर वाढवायचे असेल तर केळीच्या शेकमध्ये पीनट बटर मिसळा आणि त्याचे सेवन करा, यामुळे तुम्हाला लवकर फायदा होईल, सर्वप्रथम दूध आणि केळीचा शेक ग्राइंडरच्या भांड्यात टाकून घ्या. यानंतर, त्यांना एका ग्लासमध्ये काढा आणि त्यात पीनट बटर घाला.

Indori Poha Recipe: नाश्त्यात बनवा इंदौर स्टाइलचे पोहे, जाणून घ्या रेसिपी!

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

पुढील बातम्या