मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ayurveda Tips on Snoring: घोरण्यासाठी वरदान आहे स्वयंपाकघरातील तूप, चुटकीसरशी दूर होते समस्या

Ayurveda Tips on Snoring: घोरण्यासाठी वरदान आहे स्वयंपाकघरातील तूप, चुटकीसरशी दूर होते समस्या

Apr 05, 2023, 10:47 PM IST

    • Ayurvedic Home Remedies: घोरणे हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. आयुर्वेद तज्ञांनी तूप वापरण्याविषयी सांगितले आहे, ज्याच्या मदतीने ही समस्या दूर केली जाऊ शकते.
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी तुपाचा वापर

Ayurvedic Home Remedies: घोरणे हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. आयुर्वेद तज्ञांनी तूप वापरण्याविषयी सांगितले आहे, ज्याच्या मदतीने ही समस्या दूर केली जाऊ शकते.

    • Ayurvedic Home Remedies: घोरणे हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. आयुर्वेद तज्ञांनी तूप वापरण्याविषयी सांगितले आहे, ज्याच्या मदतीने ही समस्या दूर केली जाऊ शकते.

Cow Ghee for Snoring: घोरणे ही एक सामान्य समस्या आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घोरतात. त्याच्या येण्याचा अर्थ असा की आपण नाकाच्या आत काही समस्येने ग्रस्त आहात. खरं तर डोकं, तोंड, दात, कान आणि डोळे हे सगळं नाकाशी जोडलेलं असतं. म्हणजेच घोरणे ही केवळ नाकाची समस्या नसून या अवयवांशी संबंधित समस्येचे ही लक्षण आहे. हे टाळण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या वस्तू आणि औषधे उपलब्ध आहेत. तसं तर काही बदलांसह हे टाळण्यास मदत करू शकते. मात्र यावर उपाय म्हणून आयुर्वेदिक तज्ज्ञ दीक्षा भावसार यांनी देखील आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जाणून घ्या, घोरणे टाळण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

गायीचे तूप फायदेशीर

घोरणे टाळण्यासाठी सकाळी किंवा रात्री गायीच्या तुपाचे २ थेंब नाकपुडीत टाकल्यास चांगली झोप येते. यामुळे डोकेदुखी दूर होते, तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर असे केल्याने एलर्जी कमी होते, स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक आरोग्य सुधारते. रोज नाकात तूप घातल्याने केस गळती कमी होण्यास मदत होते. त्याच वेळी, हे तणाव दूर करण्यास, लक्ष आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करते.

थायरॉईड-संधिवात मध्ये मदत करते

नस्य ऑटो-इम्यून डिसऑर्डर विकारांमध्ये देखील खूप मदत करते. तज्ज्ञांच्या मते, ऑटो इम्यून थायरॉइड, संधिवात, मल्टिपल स्क्लेरोसिस इत्यादी रुग्णांना नस्याचे आश्चर्यकारक फायदे मिळाले आहेत.

तूप कसे वापरावे

रात्री झोपताना दोन्ही नाकपुड्यात फक्त गाईच्या तुपाचे २ थेंब टाकावे. यासाठी तूप कोमट करावे. मग कापूस, ड्रॉपर किंवा करंगळीच्या मदतीने नाकात घाला.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या