मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: या आजारांनी त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका अंडी!

Health Tips: या आजारांनी त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका अंडी!

Jan 22, 2023, 09:24 PM IST

    • Eggs Eating: अंडी हे प्रथिनांचे समृद्ध स्रोत मानले गेले आहे आणि ते खाणे फायदेशीर आहे. जरी असे असले तरी काही आजार आहेत, ज्यात चुकूनही अंडी खाऊ नयेत. त्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते.
या आजारात अंडी खाऊ नये (unsplash)

Eggs Eating: अंडी हे प्रथिनांचे समृद्ध स्रोत मानले गेले आहे आणि ते खाणे फायदेशीर आहे. जरी असे असले तरी काही आजार आहेत, ज्यात चुकूनही अंडी खाऊ नयेत. त्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते.

    • Eggs Eating: अंडी हे प्रथिनांचे समृद्ध स्रोत मानले गेले आहे आणि ते खाणे फायदेशीर आहे. जरी असे असले तरी काही आजार आहेत, ज्यात चुकूनही अंडी खाऊ नयेत. त्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते.

Avoid eating eggs in these Diseases: निरोगी राहण्यासाठी योग्य आहाराचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषतः प्रथिने आणि कॅल्शियम समृध्द आहार घेण्याची शिफारस केली जाते. प्रथिनांचा समृद्ध स्रोत असलेले अंडी खाण्यास डॉक्टर देखील सांगतात. अंडी हा केवळ प्रथिनांचा स्रोत नसून इतर आवश्यक खनिजांचाही स्रोत आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि मेंदूची हालचालही वेगाने होते. पण इतर सर्व गोष्टीं प्रमाणेच अंडी खाण्याचे काही तोटे देखील आहेत. जर तुम्ही या आजारांनी त्रस्त असाल तर अंडी खाणे टाळणे चांगले आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आजारांत अंडी खाणे टाळावे.

ट्रेंडिंग न्यूज

Health benefits: नारळाच्या तेलात तुरटी मिसळून वापरण्याचे ३ मोठे फायदे! तुम्हाला माहित आहेत का?

Hair Care Tips: ‘या’ ५ चुका तुमच्या केसांना बनवू शकतात मुळापासून निर्जीव! तुम्हीही करत नाही ना? वाचा...

Visa-Free Countries: व्हिसा न घेताही ‘या’ देशांमध्ये बिनधास्त फिरू शकतात भारतीय! पाहा कोणते आहेत हे देश...

Mothers Day 2024 Gift Ideas: ‘मदर्स डे’ला तुमच्या आईला द्या ‘या’ ५ अनोख्या गोष्टी भेट; दिवस होईल खास!

उच्च कोलेस्ट्रॉल

बॅड कोलेस्ट्रॉल रक्ताच्या नसांमध्ये जमा होते आणि त्यांना ब्लॉक करते. जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर चुकूनही अंडी खाऊ नका. अंड्यातील पिवळ्या भागामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असते. ते खाल्ल्याबरोबर शरीरात कोलेस्टेरॉल वाढू लागते. अशा परिस्थितीत तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

हृदयरोगी

जर हार्ट पेशंट असाल तर अंडी खाऊ नका. अंड्यातील पिवळ्या भागात कोलेस्ट्रॉल असते. ज्यामुळे रक्तवाहिनीत रक्तपुरवठा थांबतो. रक्ताभिसरणात समस्या असल्यास हृदयविकारांमध्ये समस्या वाढण्याची शक्यता असते.

अपचन

तुमची पचनशक्ती कमकुवत असेल आणि थोडेसे खाल्ल्यानंतर छातीत जळजळ, अॅसिडिटी, गॅस होऊ लागला असेल तर अंडी खाऊ नका. अंड्यांमध्ये प्रोटीन असते, जे पचण्यासाठी शरीराला खूप मेहनत घ्यावी लागते. जर तुम्ही अपचनाच्या समस्येने त्रस्त असाल तर अंडी खाल्ल्यानंतर पोटात दुखू शकते.

कॅन्सर

अंडी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका राहतो. रिपोर्ट्सनुसार जास्त अंडी खाल्ल्याने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर आणि महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. म्हणूनच डॉक्टर नेहमीच मर्यादित प्रमाणात अंडी खाण्याची शिफारस करतात.

जुलाब होत असताना अंडी खाऊ नका

जर तुम्हाला जुलाबाने घेरले असेल तर चुकूनही अंडी खाऊ नका. अंड्यांचा प्रभाव गरम असतो. जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या