मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mothers Day 2024 Gift Ideas: ‘मदर्स डे’ला तुमच्या आईला द्या ‘या’ ५ अनोख्या गोष्टी भेट; दिवस होईल खास!

Mothers Day 2024 Gift Ideas: ‘मदर्स डे’ला तुमच्या आईला द्या ‘या’ ५ अनोख्या गोष्टी भेट; दिवस होईल खास!

May 10, 2024, 10:50 AM IST

  • Happy Mothers Day 2024 Gift Ideas: यावर्षी १२ मे २०२४ रोजी ‘मदर्स डे’ साजरा केला जाणार आहे. आईला समर्पित हा खास दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो.

‘मदर्स डे’ला तुमच्या आईला द्या ‘या’ ५ अनोख्या गोष्टी भेट; दिवस होईल खास!

Happy Mothers Day2024 Gift Ideas: यावर्षी १२ मे २०२४ रोजी ‘मदर्स डे’ साजरा केला जाणार आहे. आईला समर्पित हा खास दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो.

  • Happy Mothers Day 2024 Gift Ideas: यावर्षी १२ मे २०२४ रोजी ‘मदर्स डे’ साजरा केला जाणार आहे. आईला समर्पित हा खास दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो.

Happy Mothers Day2024 Gift Ideas:भारतात दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी १२ मे २०२४ रोजी ‘मदर्स डे’ साजरा केला जाणार आहे. आईला समर्पित हा खास दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो. आईचे प्रेम, त्याग आणि समर्पण साजरा करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक मूल आपापल्या परीने आपल्या आईला आपल्या मनात दडलेल्या प्रेमाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला तुमच्या भावना एखाद्या सुंदर भेटवस्तूसह शेअर करायच्या असतील, तर या ‘मदर्स डे’ला अनोख्या भेटवस्तू देऊन तुम्ही दिवस खास बनवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

कस्टमाइज्ड गिफ्ट्स

आजकाल कस्टमाइज्ड भेटवस्तूंचा ट्रेंड खूप प्रसिद्ध होत आहे. या मदर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या आईला खास वाटण्यासाठी एक छान कस्टमाइज्ड गिफ्ट देखील बनवू शकता. यासाठी तुम्ही सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या अनेक ऑनलाइन वेबसाइट्सची मदत घेऊ शकता, जे अनेक प्रकारचे कस्टमाइज्ड गिफ्ट्स, दिवे, फोटो फ्रेम इत्यादी बनवतात. अशा साईट्सवरून तुम्ही तुमच्या आईच्या नावाने गिफ्ट ऑर्डर करू शकता.

Mother's Day Special: मदर्स डे ला आईसोबत एक्सप्लोर करा ही ठिकाणं, संस्मरणीय होईल दिवस

आवडत्या ठिकाणची सहल

जर तुम्ही तुमच्या आईला खूप दिवसांपासून कुठेतरी घेऊन जाऊ शकला नसाल, तर या मदर्स डेला तिला घरातील कामातून थोडासा ब्रेक द्या आणि तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जा. आईचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ कोणती असू शकत नाही.

मोबाईल ठेवता येणारी पर्स

खरेदीसाठी जाताना ‘आई’ मंडळी अनेकदा त्यांचा फोन घेऊन जात नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार अशावेळी फोन पकडायचा कि हातातल्या पिशव्या... या ‘मदर्स डे’च्या दिवशी तुम्ही त्यांची ही समस्या सोडवू शकता. त्यांच्यासाठी तुम्ही मोबाईल ठेवता येईल अशी पर्स खरेदी करू शकता. जेव्हा ती या पर्सचा वापर करेल, तेव्हा ती तुमची आठवण नक्की काढेल.

Mother's Day Recipe: आईसाठी बनवा टेस्टी रव्याचे पॉकेट्स, झटपट तयार होते ही रेसिपी

मूव्ही नाईट

तुमच्या आईला खास वाटण्यासाठी तुम्ही तिच्यासोबत मूव्ही नाईट प्लॅन करू शकता. जर आईला नवीन चित्रपट पाहायचा असेल, तर तिच्यासाठी थिएटरमध्ये आगाऊ तिकीट बुक करा. पण, जर तुम्ही घरी चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आईचे आवडते स्नॅक्स अगोदरच तयार करा. जेणेकरून तुम्हाला आईसोबत चांगला वेळ घालवता येईल.

सिल्क साडी

तुमची आई ऑफिसला जात असो किंवा गृहिणी असो, तुम्ही तिला मदर्स डेला ‘सिल्क साडी’ भेट देऊ शकता. त्यांना तुमची ही भेट खूप आवडेल. हा मदर्स डे खास बनवण्यासाठी, आईला तिच्या आवडत्या रंगाची सिल्क साडी भेट द्या.

विभाग

पुढील बातम्या