Mother's Day Special: मदर्स डे ला आईसोबत एक्सप्लोर करा ही ठिकाणं, संस्मरणीय होईल दिवस-explore these places with your mom know best travel places for mothers day celebration ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mother's Day Special: मदर्स डे ला आईसोबत एक्सप्लोर करा ही ठिकाणं, संस्मरणीय होईल दिवस

Mother's Day Special: मदर्स डे ला आईसोबत एक्सप्लोर करा ही ठिकाणं, संस्मरणीय होईल दिवस

May 10, 2024 12:26 AM IST

Mother's Day 2024: या वर्षी १२ मे रोजी मदर्स डे साजरा केला जाईल. हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही तुमच्या आईसोबत ही ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.

मदर्स डे ला आईसोबत एक्सप्लोर करण्यासाठी ठिकाणं
मदर्स डे ला आईसोबत एक्सप्लोर करण्यासाठी ठिकाणं (unsplash)

Best Travel Places For Mother's Day Celebration: प्रत्येक दिवस आईचा असतो. तरीही दरवर्षी मे महिन्यात आईला समर्पित असा मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो. हा दिवस मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा १२ मे रोजी मदर्स डे आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आईचा सन्मान करणे हा आहे. या दिवशी मुले आपल्या आईला स्पेशल फिल व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या आईला प्रवासाची आवड असेल तर तुम्ही आईला या ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकता.

दार्जिलिंग

जर तुम्हाला तुमच्या आईला रिलॅक्सिंग ट्रीपला घेऊन जायचे असेल तर शांत आणि सुंदर दार्जिलिंगला जा. इथे तुम्ही आईला चहाच्या बागेत फिरायला घेऊन जाऊ शकता. याशिवाय हिमालयातील सुंदर दृश्ये पहा आणि आनंद घ्या. तुमच्या आईसोबत इथे टॉय ट्रेनचाही आनंद घ्या.

म्हैसूर

कर्नाटकचे हिल स्टेशन म्हैसूर हे एक उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण त्याच्या इतिहासासाठी आणि भव्य राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तुमच्या आईसोबत येथे म्हैसूर पॅलेस पहा. याशिवाय इथल्या स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद नक्कीच घ्या.

उदयपूर

तुमच्या आईसोबत तलावांच्या या शहराला भेट द्या. तलावावर बोट राईड करण्यापासून ते सिटी पॅलेस आणि जगदीश मंदिराला भेट देण्यापर्यंत उदयपूरमध्ये फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. तुम्ही तुमच्या आईसोबत येथील मार्केट एक्सप्लोर करू शकता.

नैनिताल

नैनिताल हे देखील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. जिथे आपण नैसर्गिक सौंदर्य शोधू शकता. उन्हाळ्याच्या कडक उन्हातून थोडासा दिलासा मिळवण्यासाठी तुम्ही या हील स्टेशनला जाऊ शकता.  मदर्स डे सेलिब्रेशनसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग