Rava or Suji Pockets Recipe: तुम्ही स्वयंपाकात फार अनुभवी नसाल पण मदर्स डेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आईला काही खास खायला द्यायचे असेल तर रव्याचे पॉकेट्स झटपट तयार करा. तुम्ही तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ खाऊन तुमची आई खूश होईल आणि तुमचा मदर्स डे आणखी खास होईल. ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागणार नाही आणि ते सहज तयार होईल. चला तर मग जाणून घेऊया रव्याचे पॉकेट्स कसे बनवायचे.
- २ वाट्या रवा
- २ ते ३ उकडलेले बटाटे
- एक वाटी हिरवे वाटाणे
- बारीक चिरलेला कांदा
- आले लसूण पेस्ट
- बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- एक चमचा धने पूड
- जिरे पूड
- गरम मसाला
- लाल तिखट
- मीठ चवीनुसार
सर्वप्रथम पॅनमध्ये दोन कप पाणी घाला आणि त्यात थोडे मीठ घाला. हे पाणी तापायला लागल्यावर त्यात एक कप रवा घाला. आता हे पाणी नीट ढवळून शिजवा. जेणेकरून रवा पूर्ण शिजून पाणी शोषून घेईल. काही वेळात रवा सर्व पाणी शोषून घेईल आणि मळलेल्या पिठासारखा होईल. आता ते एका प्लेटमध्ये काढून झाकून ठेवा. नंतर उकडलेले बटाटे मॅश करा. कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आवडीनुसार मोहरी किंवा जिरे घाला. तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची आणि कांदे घाला. चांगले भाजून घ्या. ते भाजायला लागल्यावर त्यात उकडलेले वाटाणे टाका. तसेच लाल तिखट, धने पूड, गरम मसाला घालून मिक्स करा. आता यात मॅश केलेले बटाटे टाकून चांगे मिक्स करा. गॅसची फ्लेम मोठी करून चांगले भाजून घ्या. आता चवीनुसार मीठ घाला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडेशी आमचूर पावडरही घालू शकता. तयार केलेली पेस्ट प्लेटमध्ये काढा. आता रव्याचे पीठ घेऊन हाताला तेल लावून एकदा चांगले मळून घ्या. जेणेकरून ते पूर्णपणे गुळगुळीत होईल.
आता एका प्लेन जागेवर प्लॅस्टिकची शीट पसरवून त्यावर रव्याचा गोळा ठेवा. सपाट पृष्ठभाग असलेल्या एखाद्या जड भांडे ठेवून ते पसरवा. ते पसरल्यावर त्यात बटाट्याचे मिश्रण ठेवा आणि सर्व बाजूंनी बंद करा. जेणेकरून ते पॅकेटचे रूप घेईल. आता ही सर्व पॅकेट्स एअर फ्राय करा किंवा नॉन-स्टिक पॅनमध्ये एक एक करून सोनेरी होईपर्यंत तळा. तुमचे रव्याचे पॉकेट्स सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.
(रेसिपी: फेसबुक)