मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  होळीला स्किन केअरची चिंता सोडा, रंग खेळण्यापूर्वी फॉलो करा या गोष्टी

होळीला स्किन केअरची चिंता सोडा, रंग खेळण्यापूर्वी फॉलो करा या गोष्टी

Mar 04, 2023, 12:02 PM IST

    • Skin Care: धुलिवंदन, रंगपंचमीला रंग खेळताना त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. रंग खेळण्यापूर्वी काही गोष्टी केल्या तर तुमची स्किन खराब होणार नाही.
होळीसाठी स्किन केअर टिप्स (unsplash)

Skin Care: धुलिवंदन, रंगपंचमीला रंग खेळताना त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. रंग खेळण्यापूर्वी काही गोष्टी केल्या तर तुमची स्किन खराब होणार नाही.

    • Skin Care: धुलिवंदन, रंगपंचमीला रंग खेळताना त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. रंग खेळण्यापूर्वी काही गोष्टी केल्या तर तुमची स्किन खराब होणार नाही.

Holi Skin Care Tips: होळीचा सण म्हणजे रंगाची उधळण. रंगांमध्ये असलेले रासायनिक पदार्थ त्वचेला हानिकारक ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्वचेची निगा राखण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हानिकारक रंगांमुळे त्वचा कोरडी होणे, खाज येणे, एलर्जी, इन्फेक्शन, लालसरपणा आणि पुरळ यासारख्या त्वचेच्या समस्या भेडसावतात. होळीला रंगांमुळे उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स फॉलो केल्या पाहिजे. झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सौरभी देशपांडे यांनी रंग खेळण्यापूर्वी स्किन केअरसाठी काही टिप्स सांगितल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

रंग खेळण्यापूर्वी फॉलो करा या टिप्स

बर्फाचे तुकडे

रंग खेळण्यापूर्वी बर्फाचे तुकडे त्वचेवर फिरविणे नक्कीच फायदेशीर ठरु शकते. असे केल्याने त्वचेवरील छिद्र बंद होऊन त्यात रंग जाण्याची शक्यता देखील कमी होते. त्यामुळे मुरुमांना प्रतिबंध करता येणे शक्य होईल. बर्फाचे तुकडे किमान १५ मिनिटे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चोळू शकता.

सनस्क्रीन वापरा

होळी ही घराबाहेर खेळली जाते. त्यामुळे आपण सतत सूर्याच्या संपर्कात असतो. रंग आणि पाणी तुमच्या त्वचेतील ओलावा कमी करु शकते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि टॅन होते. त्यामुळे रंग खेळायला जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरु नका. सनस्क्रीन हा एसपीएफ ५० असावा. योग्य सनस्क्रीन निवडण्यापूर्वी तज्ञाची मदत घ्या.

शरीराला न चुकता तेल लावा

तुम्ही तुमच्या केसांनाच नव्हे तर शरीरालाही तेल लावावे. कारण तेल लावल्याने रंग सहज काढण्यास मदत होते. तसेच, रंग त्वचेत प्रवेश करत नाही. शिवाय, तेल त्वचेचा नैसर्गिक पोत सुधारण्यास आणि एलर्जी तसेच मुरुमांपासून दूर ठेवण्यास मदत करेल. यासाठी नारळ किंवा बदाम यासारखे कोणतेही तेल निवडू शकता.

चांगल्या दर्जाचा लिप बाम वापरा

आपण चेहरा, स्किनची काळजी घेताना ओठांकडे दुर्लक्ष करतो. असे अजिबात करू नका. तुमच्या त्वचेचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे तुमचे ओठ असतात. म्हणून, होळी खेळण्यापूर्वी तुमच्या ओठांना लिप बाम लावायला विसरु नका. नैसर्गिक लिप बाम तुमच्या ओठांना ओलावा देतात आणि हानिकारक रंगांपासून तुमच्या ओठांचे संरक्षण करतात. लिप बाममुळे ओठ मऊ आणि लवचिक राहतात.

पुरेसे पाणी प्या

दिवसातून कमीत कमी २ लिटर पाणी पिऊन आपले शरीर हायड्रेटेड राखणे गरजेचे आहे. जेणेकरुन कोरडेपणा आणि ब्रेकआउट्सपासून दूर राहण्यास मदत होईल. तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या