मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bread Roll: संध्याकाळी खायचंय काही टेस्टी स्नॅक्स, बनवा रवा आणि बटाटा ब्रेड रोलची ही रेसिपी

Bread Roll: संध्याकाळी खायचंय काही टेस्टी स्नॅक्स, बनवा रवा आणि बटाटा ब्रेड रोलची ही रेसिपी

Mar 12, 2024, 05:43 PM IST

    • Evening Snacks Recipe: संध्याकाळी चहासोबत नाश्त्यात काही कुरकुरीत खायची इच्छा असेल तर रवा आणि बटाट्यापासून ब्रेड रोल बनवा. ही रेसिपी सोपी आहे.
रवा आणि बटाट्याचे ब्रेड रोल (freepik)

Evening Snacks Recipe: संध्याकाळी चहासोबत नाश्त्यात काही कुरकुरीत खायची इच्छा असेल तर रवा आणि बटाट्यापासून ब्रेड रोल बनवा. ही रेसिपी सोपी आहे.

    • Evening Snacks Recipe: संध्याकाळी चहासोबत नाश्त्यात काही कुरकुरीत खायची इच्छा असेल तर रवा आणि बटाट्यापासून ब्रेड रोल बनवा. ही रेसिपी सोपी आहे.

Rava and Potato Bread Roll Recipe: संध्याकाळी लागलेली थोडीशी भूक भागवण्यासाठी चहासोबत काहीतरी खाल्ले जाते. समोसा, पकोडा किंवा सँडविच हे प्रकार मोठ्या आवडीने खाल्ले जातात. पण तुम्हाला काहीतरी वेगळं आणि क्रिस्पी खायची इच्छा असेल तर तुम्ही रवा आणि बटाट्यापासून टेस्टी ब्रेड रोल बनवू शकता. हा रोल खायला टेस्टी आणि बनवयाला सोपा आहे. चला तर जाणून घ्या रवा आणि बटाटा ब्रेड रोलची रेसिपी

ट्रेंडिंग न्यूज

Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे होऊ शकते पाठदुखी, जाणून घ्या कसे करावे उपचार

Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

रवा आणि बटाट ब्रेड रोल बनवण्यासाठी साहित्य

फिलिंगसाठी साहित्य

- २ उकडलेले बटाटे

- १ कांदा

- ३ हिरव्या मिरच्या

- कोथिंबीर

- १/४ चमचा ओवा

- काळी मिरी पावडर

- लाल तिखट,

- अर्धा चमचा चाट मसाला

- १ टीस्पून धने पावडर

- भाजलेले जिरे अर्धा चमचा

- हळद

- चवीनुसार मीठ

रव्याचे पीठ तयार करण्यासाठी साहित्य

- १ कप रवा

- २ कप पाणी

- काश्मिरी लाल तिखट

- हळद

- १ चमचा तेल

- १ चिमूटभर मीठ

रवा आणि बटाटा ब्रेड रोल बनवण्याची पद्धत

हे क्रिस्पी रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम रव्याचे पीठ तयार करा. यासाठी कढईत पाणी गरम करून त्यात हळद, तिखट, मीठ घाला. त्यात रवा घालून मिक्स करा आणि पाणी मंद आचेवर कोरडे करा. जेव्हा पाणी सुकेल आणि पिठाची कंसिस्टंसी येईल तेव्हा गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. बटाट्याचे फिलिंग बनवण्यासाठी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला. ओवा, कोथिंबीर, काळी मिरी पावडर, चाट मसाला, भाजलेले जिऱ्याची पावडर आणि मीठ घालून मिक्स करा. आता हाताला तेल लावा आणि रव्याचे पीठ चांगले मळून घ्या.

ब्रेड रोल बनवण्यासाठी तळहातावर पाणी लावून एका छोटा गोळा रव्याचे पीठ घ्या ते सपाट करा. त्याच्या मध्यभागी बटाट्याचे फिलिंग भरा आणि ते सर्व बाजूंनी नीट बंद करा. तळव्याच्या मदतीने त्याला ब्रेड रोलचा आकार द्या. याप्रमाणे सर्व ब्रेड रोल तयार करा. कढईत तेल गरम करून त्यात हे सोनेरी होईपर्यंत तळा. तुमचे रवा आणि बटाट्याचे ब्रेड रोल तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

पुढील बातम्या