मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Macaroni Recipe: नाश्त्यात बनवा स्ट्रीट स्टाइल मॅकरोनी, आठवड्याची करा टेस्टी सुरुवात

Macaroni Recipe: नाश्त्यात बनवा स्ट्रीट स्टाइल मॅकरोनी, आठवड्याची करा टेस्टी सुरुवात

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 11, 2024 09:19 AM IST

Breakfast Recipe: तुम्हाला नाश्त्यात झटपट काही बनवायचे असेल तर तुम्ही मॅकरोनी बनवू शकता. जाणून घ्या घरच्या घरी स्ट्रीट स्टाइल मॅकरोनी कशी बनवयाची.

स्ट्रीट स्टाइल मॅकरोनी
स्ट्रीट स्टाइल मॅकरोनी (freepik)

Street Style Macaroni Recipe: लोकांना रोज नाश्त्यात वेगवेगळ्या गोष्टी खायला आवडतात. मात्र महिलांना रोज काहीतरी नवीन बनवण्यासाठी तासन्तास विचार करावा लागतो. अशा स्थितीत नाश्त्यासाठी मॅकरोनी बनवता येते. मॅकरोनीचे नाव ऐकताच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. लोक वेगवेगळ्या प्रकारे मॅकरोनी तयार करतात. आम्ही तुम्हाला स्ट्रीट स्टाइल मॅकरोनी कसा बनवायचा ते सांगत आहोत. त्याची चव अप्रतिम लागते. ते बनवण्यासाठी अनेक भाज्या वापरल्या जातात. चला तर मग जाणून घ्या स्ट्रीट स्टाइल मॅकरोनी बनवण्याची रेसिपी

स्ट्रीट स्टाइल मॅकरोनी बनवण्यासाठी साहित्य

- उकडलेले मॅकरोनी - ४०० ग्रॅम

- तेल - २ टेबलस्पून

- कांदा - एक कप

- शिमला मिरची - अर्धा कप

- गाजर - अर्धा कप

- कोबी - एक कप

- कोथिंबीर

- काळी मिरी - १/४ चमचे

- धणेपावडर - १/४ टीस्पून

- गरम मसाला - १/४ टीस्पून

- व्हिनेगर - १ टीस्पून

- ग्रीन चिली सॉस - १ टीस्पून

- रेड चिली सॉस - १ टीस्पून

- केचप - २ टीस्पून

- मीठ - चवीनुसार

स्ट्रीट स्टाइल मॅकरोनी बनवण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी प्रथम सर्व भाज्या धुवा आणि नंतर सोलून बारीक चिरून घ्या. आता कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात कांदा, शिमला मिरची, गाजर, कोबी घाला. या सर्व भाज्या ठरलेल्या प्रमाणात घालाव्यात. नंतर २ मिनिटे शिजवा. मीठ, मिरपूड, व्हिनेगर, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप घालून चांगले मिक्स करा. आता उकडलेले मॅकरोनी घाला आणि २ मिनिटे शिजवा. आता धनेपावडर, गरम मसाला घालून १-२ मिनिटे शिजवा. तुमचा स्ट्रीट स्टाईल मॅकरोनी तयार आहे. कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.

मॅकरोनी उकळण्याची योग्य पद्धत

मॅकरोनी उकळण्यासाठी प्रथम पाणी उकळवा. नंतर त्यात मॅकरोनी घाला. उकळी आल्यावर गाळून त्यावर थंड पाणी टाका. शेवटी मॅकरोनीवर थोडे तेल घाला आणि मिक्स करा.

WhatsApp channel