मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Gujiya Recipe: होळीसाठी पारंपारिक रेसिपीने बनवा गुजिया, सर्वांना आवडेल चव

Gujiya Recipe: होळीसाठी पारंपारिक रेसिपीने बनवा गुजिया, सर्वांना आवडेल चव

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 10, 2024 06:53 PM IST

Holi Special Recipe: होळी लवकरच येत आहे. अशा परिस्थितीत बहुतांश घरांमध्ये नाश्ता तयार होऊ लागला आहे. जाणून घ्या गुजिया बनवण्याची पारंपरिक रेसिपी

गुजिया
गुजिया (freepik)

Gujiya Traditional Recipe: यंदा २५ मार्चला होळीचा सण साजरा होणार आहे. या सणाला घरी मिठाई बनवली जात नाही हे अशक्य आहे. होळीच्या दिवशी प्रत्येक घरात खास गुजिया बनवल्या जातात. काही लोक होळीच्या पूजेला गुजियाचा प्रसाद अर्पण करतात. हे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जाते. येथे आम्ही तुम्हाला मावाची गुजियाची पारंपारिक रेसिपी सांगत आहोत. या रेसिपीने तुम्ही घरच्या घरी टेस्टी गुजिया बनवू शकता.

गुजिया बनवण्यासाठी साहित्य

- २ वाट्या मैदा

- तूप

- १ वाटी खवा

- १ वाटी साखर

- १ चमचा छोटी वेलची पावडर

- १ चमचा किसलेले बदाम

- ४ चमचे मनुके

- पाणी

गुजिया बनवण्याची पद्धत 

गुजिया बनवण्यासाठी आधी पीठ मळून घ्या. यासाठी थोडे तूप आणि पाणी घेऊन मैदा नीट मळून घ्या. यानंतर हे पीठ सुमारे अर्धा तास बाजूला ठेवा. पीठ सेट होत असताना सारण तयार करा. यासाठी थोडा वेळ खवा मंद आचेवर भाजून घ्या. नंतर ते थंड झाल्यावर त्यात किसलेले बदाम, वेलची पूड, मनुके आणि पिठीसाखर घाला. आता मळलेल्या पिठाच्या गोलाकार पुऱ्या तयार करा आणि त्यात मिश्रण भरा. आता त्याच्या कडांवर हलके पाणी लावून बंद करा. आता तुम्ही फॅन्सी कटरच्या मदतीने त्याच्या कडांना आकार देऊ शकता. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही करंजीसारखे साधे सुद्धा ठेवू शकता. अशाच पद्धतीने सर्व गुजिया तयार करून घ्या. नंतर कढईत तूप गरम करून गुजिया तळून घ्या. मंद आचेवर हलके तपकिरी होईपर्यंत तळा. तुमचे टेस्टी गुजिया तयार आहे. 

तुम्हाला पाकातले गुजिया आवडत असल्यास एका भांड्यात साखर आणि पाणी घालून सरबत तयार करा. नंतर तळलेले गुजिया पाकात टाका. नंतर ताटात काढा आणि थंड झाल्यावर डब्यात ठेवा.