Chocolate Bar Recipe: अशा प्रकारे बनवा ओट्स आणि खजूरचे शुगर फ्री चॉकलेट, मधुमेही रुग्णही करू शकतात टेस्ट-how to make sugar free chocolate bar with oats and dates diabetic patients can also try this recipe ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chocolate Bar Recipe: अशा प्रकारे बनवा ओट्स आणि खजूरचे शुगर फ्री चॉकलेट, मधुमेही रुग्णही करू शकतात टेस्ट

Chocolate Bar Recipe: अशा प्रकारे बनवा ओट्स आणि खजूरचे शुगर फ्री चॉकलेट, मधुमेही रुग्णही करू शकतात टेस्ट

Mar 11, 2024 06:13 PM IST

Sugar Free Chocolate Bar Recipe: घरच्या घरी शुगर फ्री चॉकलेट बनवता येते. हेल्दी अशा ओट्स आणि खजूर पासून चॉकलेट बार कसे बनवायचे जाणून घ्या.

ओट्स आणि खजूरचे चॉकलेट बार
ओट्स आणि खजूरचे चॉकलेट बार

Oats and Dates Chocolate Bar Recipe: ओट्स हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे प्रथिने समृद्ध असतात. अशा स्थितीत रोज नाश्त्यात ओट्स खाणे चांगले मानले जाते. अचानक लागणारी भूक किंवा गोड खायची क्रेविंग मिटवण्यासाठी तुम्ही ओट्स आणि खजूर मिक्स करून चॉकलेट बार तयार करू शकता. हे घरी बनवणे सोपे आहे आणि पटकन तयार होते. विशेष म्हणजे मधुमेही रुग्णही या चॉकलेट बारचा आस्वाद घेऊ शकतात. चला तर मग जाणून घ्या ओट्स आणि खजूरचे चॉकलेट बार कसे बनवायचे.

ओट्स खजूर चॉकलेट बार बनवण्यासाठी साहित्य

- १५-१८ खजूर

- दीड कप ओट्स

- अर्धा टीस्पून बेकिंग सोडा

- डार्क चॉकलेट

- १ टेबलस्पून मिक्स बिया

- अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स

- चॉकलेट कोटिंगसाठी १०० ग्रॅम अमूल शुगरफ्री चॉकलेट

- एक कप गरम पाणी

- 1 टेबलस्पून न्यूट्रल तेल

ओट्स आणि खजूर चॉकलेट बार बनवण्याची पद्धत

ओट्स आणि खजूरचे चॉकलेट बार बनवण्यासाठी प्रथम खजुराच्या बिया काढून टाका. नंतर हे काही वेळ गरम पाण्यात भिजवा. नंतर बारीक करून घ्या. आता त्यात सर्व साहित्य टाका आणि मिक्स करा. आता साधारण ३०-४० मिनिटे किंवा चांगले शिजेपर्यंत बेक करा. ते चांगले शिजल्यावर कापून घ्या आणि नंतर चॉकलेट सॉसमध्ये बुडवा. आता हे चांगले छान थंड करून घ्या. तुमचे ओट्स आणि खजूरचे चॉकलेट बार सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.