मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eid Al-Fitr 2024 Recipe: ईदला बनवा आणखी खास शिरखुर्मासोबत, ट्राय करा ही टेस्टी रेसिपी

Eid Al-Fitr 2024 Recipe: ईदला बनवा आणखी खास शिरखुर्मासोबत, ट्राय करा ही टेस्टी रेसिपी

Apr 08, 2024, 07:31 PM IST

    • Eid Special Recipe: ईदला घरी आलेल्या पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी काही पारंपारिक डेझर्ट तयार केले जातात. ज्यामध्ये शिरखुर्माचे नाव आहे. शिरखुर्मा कसा बनवायचा ते पाहा.
Eid Al-Fitr 2024 Recipe: ईदला बनवा आणखी खास शीर खुरमासोबत, ट्राय करा ही टेस्टी रेसिपी

Eid Special Recipe: ईदला घरी आलेल्या पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी काही पारंपारिक डेझर्ट तयार केले जातात. ज्यामध्ये शिरखुर्माचे नाव आहे. शिरखुर्मा कसा बनवायचा ते पाहा.

    • Eid Special Recipe: ईदला घरी आलेल्या पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी काही पारंपारिक डेझर्ट तयार केले जातात. ज्यामध्ये शिरखुर्माचे नाव आहे. शिरखुर्मा कसा बनवायचा ते पाहा.

Sheer Khurma Recipe: रमजान हा इस्लामचा सर्वात पवित्र महिना मानला जातो, ज्याचे मुस्लिम लोकांसाठी विशेष महत्त्व आहे. या महिन्यात इस्लाम धर्माचे पालन करणारे लोक ३० दिवस उपवास करून अल्लाहची पूजा करतात. हा पवित्र महिना ईद-उल- फित्रने संपतो. यावर्षी भारतात १० एप्रिल किंवा ११ एप्रिल रोजी ईद उल फित्र साजरी होणार आहे. तथापि ईद कोणत्या दिवशी साजरी केली जाईल हे देखील चंद्र दिसण्यावर अवलंबून आहे. ईद-उल-फित्रच्या दिवशी घरी आलेल्या पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी काही पारंपारिक मिष्टान्न तयार केले जातात. ज्यामध्ये शिरखुर्माचे नाव आहे. शिरखुर्मा हा एक खूप टेस्टी गोड पदार्थ आहे जो विशेषतः ईदच्या दिवशी तयार केला जातो. तुम्हालाही ही ईद खास बनवायची असेल तर पारंपारिक शिरखुर्माची ही रेसिपी ट्राय करा.

ट्रेंडिंग न्यूज

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

शिरखुर्मा बनवण्यासाठी साहित्य

- शेवया - २०० ग्रॅम

- दूध - २ लिटर

- केशर - चिमूटभर

- वेलची - ५-६

- साखर - २ कप

- काजू - १०

- पिस्ता - १०

- बदाम - १०

- तूप - ३ चमचे

शिरखुर्मा बनवण्याची पद्धत

शिरखुर्मा बनवण्यासाठी प्रथम एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप टाकून गरम करा. तूप वितळल्यावर त्यात शेवया घाला आणि मंद आचेवर २ ते ३ मिनिटे परतून घ्या. शेवयांचा रंग हलका तपकिरी झाला की गॅस बंद करा. भाजलेल्या शेवया एका भांड्यात काढून बाजूला ठेवा. आता एका खोल तळाच्या भांड्यात दूध गरम करा. दूध उकळायला लागल्यावर त्यात वेलची आणि केशर घालून ते दूध अर्धे होईपर्यंत उकळा. यानंतर दुधात चवीनुसार साखर घालून अजून थोडा वेळ शिजू द्या. दूध अधून मधून चमच्याने ढवळत शिजवा. आता दुधात बारीक चिरलेल्या ड्रायफ्रुट्सचे तुकडे घाला. दूध चांगले शिजल्यावर त्यात आधी भाजलेल्या शेवया घाला आणि चमच्याने चांगले मिक्स करा. 

यानंतर शिरखुर्माला आणखी ५-७ मिनिटे शिजू द्या. आता गॅस बंद करा. तुमचा चविष्ट ईद स्पेशल शिरखुर्मा तयार आहे. सर्विंग बाऊलमध्ये शिरखुर्मा काढून ड्रायफ्रुट्सने सजवून सर्व्ह करा.

पुढील बातम्या