Puran Poli Recipe: पुरण पोळीशिवाय गुढीपाडव्याचा सण अपूर्ण आहे. अनेक घरांमध्ये गुढीपाडव्याला पुरण पोळी बनवली जाते. पण अनेक महिलांची तक्रार असते की प्रयत्न करूनही त्यांची पुरण पोळी मऊ होत नाही. पुरण पोळी बनवताना अगदी पुरण शिजवण्यापासून पोळी लाटेपर्यंत काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला सुद्धा अशी तक्रार असेल तर यावेळी मऊ आणि लुसलुशीत पुरण पोळी बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा. काही टिप्स फॉलो करून तुम्ही परफेक्ट पुरण पोळी बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.
- १ वाटी चणा डाळ
- २ चमचे तूप
- १ वाटी गूळ
- १ टीस्पून हिरवी वेलची पावडर
- १ टीस्पून जायफळ पावडर
- १ कप गव्हाचे पीठ
- अर्धा चमचा तेल
- चवीनुसार मीठ
पुरण पोळी बनवण्यासाठी प्रथम पुरण शिजवून घ्या. यासाठी चणा डाळ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या. डाळ शिजवताना त्यात थोडेसे तांदूळ टाकल्याने पुरण चांगले होते. डाळ शिजल्यावर बारीक करून घ्या. आता एका कढईत मध्यम आचेवर तूप गरम करा. नंतर त्यात बारीक केलेली चणा टाळ टाका. साधारण २-३ मिनिटे परतून झाल्यावर त्यात गूळ घाला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता. आता हे पुरण सतत ढवळत राहा आणि शिजवून घ्या. पुरण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ ठेवू नका. पुरण शिजत आल्यावर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा.
आता पोळी बनवण्यासाठी मीठ मळून घ्या. यासाठी एका प्लेटमध्ये गव्हाचे पीठ घ्या. तुम्ही मैदा देखील वापरू शकता. त्यात तेल आणि मीठ टाकून पीठ मळून घ्या. आता या पीठाचा गोळा घेऊन थोडेसे लाटून घ्या. आता त्यात मध्यभागी तयार केलेले पुरण भरा आणि नीट बंद करा. आता हलक्या हाताने पुरण पोळी लाटून घ्या. आता तवा गरम करून त्यावर लाटलेली पुरण पोळी हलक्या हाताने ठेवा. दोन्ही बाजूने तूप घालून नीट भाजून घ्या. तुमची पुरण पोळी तयार आहे.
संबंधित बातम्या