मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तरुणाईचं हार्टबीट वाढवायला सज्ज झालीये शिवाली परब! 'हार्टबीट वाढणार हाय' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

तरुणाईचं हार्टबीट वाढवायला सज्ज झालीये शिवाली परब! 'हार्टबीट वाढणार हाय' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Apr 23, 2024, 10:46 PM IST

  • 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब हिने आजवर तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने साऱ्यांची मनं जिंकली. आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे.

तरुणाईचं हार्टबीट वाढवायला सज्ज झालीये शिवली परब! 'हार्टबीट वाढणार हाय' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब हिने आजवर तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने साऱ्यांची मनं जिंकली. आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे.

  • 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब हिने आजवर तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने साऱ्यांची मनं जिंकली. आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे.

सध्या एकामागोमाग एक रोमँटिक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. सोशल मीडियावरील रील्समुळे ही गाणी ट्रेंडिंगमध्ये आलेली पाहायला मिळत आहेत. अशातच आता यंदाच्या उन्हाळयात हार्टबीट वाढवायला 'हार्टबीट वाढणार हाय' हे नवंकोरं रोमँटिक गाणं सध्या तरुणाईला भुरळ घालत आहे. दोन तरुण जोडप्यांमधील प्रेमळ संवाद या गाण्यातून पाहायला मिळत आहे. यावेळी रोमँटिक गाण्यासह या गाण्यात तरुणाईचं बालिश प्रेम पाहणं रंजक ठरतंय. हे हार्टबीट वाढवणारं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, या गाण्याला चाहते आणि नेटकरी भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता विशाल राठोड या गाण्यात स्क्रीन शेअर करताना दिसले. 'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्यात शिवाली व विशालचा नटखट अंदाज साऱ्यांना अधिक भावला असून, हे गाणं अनेकांच्या तोंडून ऐकू येत आहे. शैलेश राठोडच्या या 'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्याच्या निर्मितीची धुरा शैलेश राठोडने उत्तमरीत्या निभावली आहे.

अंतराची अंगठी सापडणार; लीला आणि अभिरामचा साखरपुडा होणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठा ट्वीस्ट

नव्या गाण्याची जोरदार हवा

या नव्या कोऱ्या गाण्याने आता सोशल मीडियावर एन्ट्री केली असून, हे गाणं ही प्रेक्षकांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. या गाण्याच्या दिग्दर्शनाची बाजू अभिजीत दाणी यांनी सांभाळली आहे. तर, या रोमँटिक गाण्याला सुमधुर स्वरात शैलेश राठोडने स्वरबद्ध केलं आहे. इतकंच नव्हेतर या गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची आणि संवादाची धुरा शैलेशने पेलवली आहे.

Viral Video: विकी कौशलसोबत झळकणार मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर; धमाल व्हिडीओ होतोय व्हायरल!

शिवालीच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून पसंती!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब हिने आजवर तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने साऱ्यांची मनं जिंकली. आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे. याधी शिवाली परब ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी झाली आहे. यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले. तर, काही म्युझिक व्हिडीओमध्ये देखील शिवाली झळकली आहे. शिवालीच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली आहे. आता शिवालीचे नवीन गाणे येतंय म्हटल्यानंतर तिचे चाहते पुन्हा एकदा खुश झाले आहेत. शिवालीच्या या गाण्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

विभाग

पुढील बातम्या