मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘खबरदार! बायको-मुली आणि कुटुंबाबद्दल बोलाल तर शोधून कानाखाली जाळ काढेन’; महेश मांजरेकर का संतापले?

‘खबरदार! बायको-मुली आणि कुटुंबाबद्दल बोलाल तर शोधून कानाखाली जाळ काढेन’; महेश मांजरेकर का संतापले?

Apr 24, 2024, 08:49 PM IST

  • अभिनेते महेश मांजरेकर यांनी ट्रोलिंगच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं आहे. ‘आई-बहिण, मुली आणि कुटुंबावरून बोलणाऱ्या लोकांना मी शोधून काढून कानफाटावेन’, असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत.

‘खबरदार! बायको-मुली आणि कुटुंबाबद्दल बोलाल तर शोधून कानाखाली जाळ काढेन’; महेश मांजरेकर का संतापले?

अभिनेते महेश मांजरेकर यांनी ट्रोलिंगच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं आहे. ‘आई-बहिण, मुली आणि कुटुंबावरून बोलणाऱ्या लोकांना मी शोधून काढून कानफाटावेन’, असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत.

  • अभिनेते महेश मांजरेकर यांनी ट्रोलिंगच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं आहे. ‘आई-बहिण, मुली आणि कुटुंबावरून बोलणाऱ्या लोकांना मी शोधून काढून कानफाटावेन’, असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत.

सध्या मनोरंजन विश्वात ट्रोलिंगचा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे. कलाकारांना ट्रोल करणं, हे तसं नवं नाही. मात्र, सध्या ट्रोलिंगची पातळी इतकी घसरली आहे की, लोक आता कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यवरही अतिशय अश्लाघ्य भाषेत कमेंट करू लागले आहेत. अनेकदा कलाकारांनी ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केलं. मात्र, आता ट्रोलर्स त्यांच्या कुटुंबाविषयी देखील अर्वाच्या भाषेत बोलू लागले आहेत. कुणी कलाकारांच्या कुटुंबाला शिव्या देतं, तर कुणी त्यांच्याबद्दल वाईट बोलतं. या सगळ्या गोष्टींचा सामना कलाकारांना तर करावाच लागतो. मात्र, या सगळ्या गोष्टीचा मन:स्ताप त्यांच्या कुटुंबाला देखील भोगाव लागतो. अनेक कलाकारांनी अलीकडे ट्रोलिंग विरोधात बोलणं सुरू केलं आहे. नुकताच चिन्मय मांडलेकर याचा मुद्दा ताजा असतानाच, आता अभिनेते-दिग्दर्शक-लेखक महेश मांजरेकर यांनी देखील या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं आहे. ‘आई-बहिण, मुली आणि कुटुंबावरून बोलणाऱ्या लोकांना मी शोधून काढून कानफाटावेन’, असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

अभिनेते महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दरम्यान महेश मांजरेकर वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आणि मुलाखती देण्यात व्यस्त आहेत. दरम्यान त्यांनी नुकतीच एका आघाडीच्या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. या मुलाखती त्यांनी ट्रोलिंगवर थेट भाष्य केलं. सोशल मीडिया वापरताना लोक ज्याप्रकारे त्याचा गैरवापर करतात, त्यावर महेश मंजरेकरांनी त्यांना चांगलंच खडसावलं आहे.

लीला आणि अभिरामच्या साखरपुड्यानंतर दुर्गा समोर येणार सत्य! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

राग यायलाच हवा!

ट्रोलिंगच्या मुद्द्यावर कलाकारांना राग येतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना महेश मांजरेकर म्हणाले की, ‘राग हा यायलाच हवा. अनेक लोक म्हणतात की, दुर्लक्ष करा. पण, का? आम्ही याकडे दुर्लक्ष का करायचं? आमच्या कुटुंबाबद्दल किंवा आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? आम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर कधी काही बोलतो का? मी एखादा चित्रपट बनवतो, तुम्ही जाऊन तो बघता. तो पाहायला तुम्ही पैसे दिले आहेत, त्यामुळे त्या चित्रपटाविषयी बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तो चित्रपट आवडला नाही, तर त्यावरून मला बोलण्याचा अधिकारही तुमच्याकडे आहे. कलाकार म्हणून तुम्ही क्रिटिसाइज केलं, तर काही वाटणार नाही. कारण तुम्ही आमचे प्रेक्षक आहात आणि तुमच्या आवडीचा आम्ही आदर करतो.’

शोधून काढेन आणि कानाखाली वाजवेन!

पुढे महेश मांजरेकर म्हणाले की, ‘मात्र मी एखादी पोस्ट केल्यानंतर त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन माझी आई, वडील, मुलगी, बायको किंवा कुटुंबातील इतर कोणाविषयीही काही बोलण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. असं कोणी केल्यास चवताळल्यासारखा होऊन, मी त्या व्यक्तीला शोधून काढेन आणि कानाखाली मारेन.’ यावेळी बोलताना महेश मांजरेकर यांनी एक किस्सा देखील सांगितला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीबद्दल सोशल मीडियावर अतिशय वाईट लिहिलं जात होतं. मुलीविषयी इतकं वाईट गोष्टी वाचून संतापलेल्या महेश मांजरेकर यांनी त्या व्यक्तीला शोधून काढलं आणि त्या व्यक्ती विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. अशा लोकांना का माफ करावं? या गोष्टी तेव्हा संपतील, जेव्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्याविरोधात एखादा कायदा तयार केला जाईल, असं मतही त्यांनी मांडलं.

पुढील बातम्या