मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Irrfan Khan Birthday: बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही गाजवलं नाव; इरफान खानबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Irrfan Khan Birthday: बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही गाजवलं नाव; इरफान खानबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Jan 07, 2023, 07:30 AM IST

    • Irrfan Khan Birth Anniversary : अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना इरफान खानने या क्षेत्रात येण्याचं धाडस केलं. अगदी बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
Irrfan Khan

Irrfan Khan Birth Anniversary : अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना इरफान खानने या क्षेत्रात येण्याचं धाडस केलं. अगदी बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

    • Irrfan Khan Birth Anniversary : अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना इरफान खानने या क्षेत्रात येण्याचं धाडस केलं. अगदी बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

Irrfan Khan Birth Anniversary: अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना इरफान खानने या क्षेत्रात येण्याचं धाडस केलं. अगदी बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. आज जरी इरफान आपल्यात नसला, तरी त्यच्या दमदार अभिनय आणि संवादशैलीमुळे चाहत्यांच्या मनात कायम अजरामर आहे. इरफानचा जन्म राजस्थानच्या टोंकमधल्या एका नवाबी कुटुंबात झाला होता. ७ जानेवारी १९६७ मध्ये जन्मलेल्या या अभिनेत्याचे संपूर्ण नाव ‘साहेबजादे इरफान अली खान’ असे होते. इरफानचं संपूर्ण बालपण राजस्थानमध्येच गेलं.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

प्रत्येक कुटुंबात वडिलांनी आपल्या मुलांसाठी काही स्वप्न पाहिलेली असतात. त्याचं प्रमाणे मोठं होऊन इरफानने आपला टायरचा व्यवसाय सांभाळावा अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्याला मात्र लहानपणापासूनच क्रिकेटर व्हायचे होते. अभिनय क्षेत्रात तो अगदी ओघओघानेच आला. त्यांच्या गावात थिएटर नव्हतं. पण, त्याच्या आत्याच्या गावी गेल्यावर तो भिंतीवरून उडी मारून चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन बसायचा. इथूनच त्याच्यात चित्रपटांविषयी गोडी निर्माण झाली.

त्याचवेळी एका परिचिताने इरफानला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाऊन या गोष्टी शिकण्याचा सल्ला दिला. त्या क्षणापासून इरफानला जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी एनएसडीच दिसू लागलं. अखेर त्याने तिथे प्रवेश मिळवला आणि तिथून उत्तीर्ण होऊन तो मुंबईत दाखल झाला. नवाबी पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफानला मायानगरीत आल्यावर मात्र अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.

घरादारापासून लांब आलेल्या इरफानने एव्हाना अनेक दिग्दर्शकांकडे रांगा लावायला सुरुवात केली होती. याचवेळी दोन वेळची भूक भागावी आणि राहायला आसरा मिळावा म्हणून त्याने एका मित्राच्या मदतीने एसी मेकॅनिक म्हणून काम करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात त्याने दूरदर्शन, सेट इंडिया, स्टार प्लस या सुरुवातीच्या काळातील मनोरंजन वाहिन्यांमध्ये मिळेल काम करण्यास सुरुवात केली होती. ‘चंद्रकांता’, ‘चाणक्य’, ‘भारत एक खोज’, ‘श्रीकांत’, ‘बनेगी अपनी बात’सारख्या मालिकांमधून तो प्रेक्षकांना भेटत राहिला.

मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. त्याची छोटीशी भूमिका असलेल्या या चित्रपटाला जागतिक स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले, तर ऑस्करसाठी नामांकनदेखील मिळालेलं. लंडनस्थित दिग्दर्शक असिफ कपाडिया यांनी भारतात ‘द वॉरीअर’ या चित्रपटासाठी नायक म्हणून इरफान खानची निवड केली गेली. त्याच्या या चित्रपटाने आंतरराष्ट्रीयस्तरावर कीर्ती मिळवली.

इरफानसोबत एनएसडीमध्ये शिकणाऱ्या तिग्मांशू धुलियाने इरफानला २००३मध्ये ‘हासिल’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणाऱ्याची संधी दिली. या भूमिकेसाठी त्याला पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिग्मांशूच्या ‘चरस’, ‘पानसिंग तोमर’, ‘बेगम सामरू’, ‘साहेब, बीबी और गँगस्टर रिटर्न’, ‘बुलेट राजा’ या चित्रपटात इरफान झळकला. ‘पानसिंग तोमर’साठी इरफानला अभिनयाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. मॅकबेथवर आधारित ‘मकबूल’मधील भूमिकेने त्याने आपलं वेगळेपण सिद्ध केलं. ‘रोग’ चित्रपटानंतर तो खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीत स्थिरस्थावर झाला.

‘मेट्रो’, ‘द नेमसेक’, ‘स्लम डॉग मिलेनिअर’, ‘मुंबई मेरी जान’, ‘न्यूयॉर्क’, ‘सात खून माफ’, ‘द लंच बॉक्स’, ‘हैदर’, ‘तलवार’, ‘पिकू’, ‘हिंदी मीडियम’, ‘करीब करीब सिंगल’ या सगळ्याच चित्रपटांसाठी इरफानला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. २०११ मध्ये त्याला ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’, ‘लाईफ ऑफ पाय’, ‘लाईफ इन मेट्रो’, ‘सच अ लॉंग जर्नी’ सारख्या इंग्रजी चित्रपटांतूनही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ‘द ट्रिटमेंट’ या इंग्रजी मालिकेत त्याने साकारलेला ‘सुनील’ अमेरिकेतील प्रेक्षकांची दाद मिळवून गेला.

विभाग

पुढील बातम्या