मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Genelia D’Souza: जिनिलीया डिसुझाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’? ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बांधला कयास!

Genelia D’Souza: जिनिलीया डिसुझाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’? ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बांधला कयास!

Sep 10, 2023, 11:55 AM IST

  • Genelia D’Souza Pregnancy: जिनिलीया गरोदर असून, लवकरच त्यांच्या घरी तिसऱ्या बाळाचे आगमन होणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.

Genelia D’Souza Pregnancy

Genelia D’Souza Pregnancy: जिनिलीया गरोदर असून, लवकरच त्यांच्या घरी तिसऱ्या बाळाचे आगमन होणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.

  • Genelia D’Souza Pregnancy: जिनिलीया गरोदर असून, लवकरच त्यांच्या घरी तिसऱ्या बाळाचे आगमन होणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.

Genelia D’Souza Pregnancy: बॉलिवूडचे पॉवर कपल रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूझा ही बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघेही नेहमी त्यांच्या क्युट केमिस्ट्री आणि बाँडिंगने सगळ्यांना थक्क करतात. इतकेच नाही तर, रितेश आणि जिनिलीयाचे यांच्या दोन्ही मुलांचे देखील चाहते कौतुक करतात. या दोघांनी आपल्या मुलांवर ज्या प्रकारे संस्कार केले आहेत, ते पाहून सगळेच प्रभावित होतात. आता ही जोडी पुन्हा एकदा बाळाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहे, असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कलामुळे मिळाली अद्वैतला डील, काय घडणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात

चैतन्य हुशारी करणार; साक्षीच्या फोनमधून पुरावे मिळवणार! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर!

प्रेमकहाणी की भयानक गुन्ह्याचा उलगडा? 'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून उलगडणार मोठं कोडं! ‘या’ दिवशी होणार रिलीज

'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक

जिनिलीया गरोदर असून, लवकरच त्यांच्या घरी तिसऱ्या बाळाचे आगमन होणार असल्याचे चाहते बोलत आहेत. अचानक जिनिलीयाच्या प्रेग्नेंसीच्या अफवा उडू लागल्या आहेत. याला कारण ठरला आहे, तिचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओ. नुकतीच ही जोडी एका कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. यातीलच एक व्हिडीओ पाहून जिनिलीया तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला.

Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन!

या व्हिडीओंमध्ये रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूजा एकत्र खूप क्यूट दिसत आहेत. मात्र, यावेळी अभिनेता रितेश देशमुख पत्नीचा हात धरून तिची काळजी घेताना दिसत आहे. यावेळी पर्पल मिनी ड्रेसमध्ये दिसणाऱ्या जिनिलीयाला पाहून लोकांच्या नजरा तिच्या बेबी बंपवर खिळल्या होत्या. या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप दिसत असल्याचे चाहते म्हणत आहेत. दरम्यान जिनिलीया देखील सतत आपल्या पोटावर हात ठेवताना दिसल्याने आता या चर्चांना हवा मिळाली आहे.

त्यांना पाहून चाहत्यांनी तिसऱ्या बाळाच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला आहे. एकीकडे अभिनेत्रीच्या लूकची चर्चा आहे, तर दुसरीकडे सोशल मीडिया यूजर्स रितेश आणि जिनिलीयाच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे का, असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ज्या प्रकारे अभिनेत्री पोटावर हात ठेवताना दिसली, त्यावरून लोकांना वाटत आहे की, लवकरच अभिनेत्री ही खुशखबर जाहीर करेल. आता चाहतेही त्या क्षणाची वाट पाहत आहेत.

पुढील बातम्या