Jawan Box Office Collection: ‘जवान’चा बॉक्स ऑफिसवर डंका! अवघ्या ३ दिवसांत केली छप्परफाड कमाई
Jawan Box Office Collection Day 3: ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत साऊथ अभिनेत्री नयनतारा झळकली आहे. दोघांची जोडी पडद्यावर चांगलीच गाजत आहे.
Jawan Box Office Collection Day 3: सध्या शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. किंग खानचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट इतिहास रचताना दिसत आहे. शाहरुख खानच्या या आधी रिलीज झालेल्या ‘पठान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. मात्र, आता ‘जवान’ने त्याचे विक्रम देखील मोडीत काढले आहेत. ‘जवान’ हा चित्रपट ‘पठाण’च्याही दोन पावले पुढे गेला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
या चित्रपटात शाहरुख खानसोबत साऊथ अभिनेत्री नयनतारा झळकली आहे. दोघांची जोडी पडद्यावर चांगलीच गाजत आहे. पहिल्यांदाच चित्रपटाच्या पडद्यावर दिसणारी ही केमिस्ट्री चाहत्यांनाही आवडली आहे. चित्रपटात दाखवलेल्या धमाकेदार सीन्सचही कौतुक होत आहे. त्यामुळेच तिसऱ्या दिवशीच ‘जवान’ची छप्परफाड कामगिरी बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे.
Atul Kulkarni Birthday: दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अतुल कुलकर्णींबद्दल ‘हे’ माहितीये का?
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ‘जवान’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अंदाजे ७४.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये ६६ कोटी हिंदी व्हर्जन, ५ कोटी तमिळ आणि ३.५ कोटी तेलुगू व्हर्जनचा समावेश आहे. तिसऱ्या दिवशी बंपर कमाई केल्यानंतर शाहरुख खानचा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
‘जवान’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ५३.२३ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी ७४.५ कोटी रुपयांची कमाई केली असून, एकूण २०२.७३ कोटी रुपयांचे कलेक्शन जमवले आहे. ‘जवान’ रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता. ‘जवान’ने या सगळ्या अपेक्षांची पुरती केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानने दुहेरी भूमिका साकारली आहे. त्याची एक भूमिका वडिलांची आणि दुसरी भूमिका मुलाची आहे. या दोन्ही पात्रांमध्ये चाहत्यांना तो खूप आवडला आहे. विजय सेतुपती या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर, दीपिका पदुकोण, संजय दत्त यांनी कॅमिओ भूमिका केल्या आहेत. याशिवाय सुनील ग्रोव्हर, संजीता भट्टाचार्य, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांसारखे स्टार्सही चित्रपटात दिसले आहेत.