Riteish Deshmukh: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची रिअल लाईफ पत्नी अर्थात अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता अनेक महिने झाले असले, तरी या चित्रपटाची जादू अद्याप ओसरली नाहीये. केवळ चित्रपटच नव्हे, तर यातील गाण्यांनी देखील चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. नुकताच रितेश देशमुख विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी एका छोट्या चाहत्याने त्याच्यासोबत डान्स करण्याचा हट्ट केला. रितेशनेही आपल्या या छोट्या चाहत्याची इच्छा पूर्ण केली आहे.