Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन!

Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन!

Published Sep 10, 2023 10:17 AM IST

Welcome To The Jungle Announcement: बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’चा टीझर रिलीज झाला असून, त्यात अक्षय कुमारसोबत रवीना टंडन ही जोडी दिसली आहे.

Welcome To The Jungle
Welcome To The Jungle

Welcome To The Jungle Announcement: टिप-टिप बरसा पानी... बॉलिवूड चित्रपटातल हे गाजलेलं गाण आठवलं की, डोळ्यासमोर येते ती पिवळ्या साडीत पावसात भिजत डान्स करणारी रवीना टंडन आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असलेला अक्षय कुमार. आजघडीलाही हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे. ९०च्या दशकात अक्षय आणि रवीना एक हिट कपल बनले होते. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन रोमान्स बहरत असतानाच दोघांमध्ये दुरावा आला. यानंतर अनेक वर्ष उलटली, पण दोघेही पुन्हा एकत्र दिसले नाहीत. मात्र, आता या जोडीच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. एनेक वर्षांच्या दुराव्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर परतली आहे.

‘मोहरा’ व्यतिरिक्त अक्षय आणि रवीनाची जोडी अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. एकत्र काम करत असताना अक्षय आणि रवीना एकमेकांच्या प्रेमातही पडले. अगदी रिलेशनशीपबाबत ते खूप गंभीर होते. दोघांनीही घरच्यांच्या उपस्थितीत गुपचूप साखरपुडा केल्याचेही बोलले जात होते. पण त्यांच्या साखरपुड्याच्या काही दिवसांनंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या. एका मुलाखतीत रवीनाने अक्षयवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. मात्र, अक्षयने नेहमीच मौन बाळगले.

Jawan Box Office Collection: ‘जवान’चा बॉक्स ऑफिसवर डंका! अवघ्या ३ दिवसांत केली छप्परफाड कमाई

दरम्यानच्या काळात शिल्पा शेट्टीशी जवळीक वाढल्याने अक्षयने रवीनापासून दुरावल्याचे बोलले गेले. मात्र, नंतर अक्षयच्या प्रेमात शिल्पाचाही विश्वासघातच झाला. पण, तेव्हापासून रवीनाने अक्षयपासून अंतर ठेवले होते. दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत. मात्र, आता अनेक वर्षांनंतर ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाली आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचा अर्थात ‘वेलकम टू द जंगल’चा टीझर रिलीज झाला असून, त्यात अक्षय कुमारसोबत रवीना टंडन दिसली आहे.

'वेलकम ३’ या आगामी चित्रपटाचे अधिकृत शीर्षक 'वेलकम टू द जंगल' करण्यात आले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिशा पाटनी, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांसारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या चित्रपटात संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची जोडी दिसणार असल्याने चाहत्यांना 'मुन्नाभाई एमबीबीएस'ची झलकही मिळणार आहे. याशिवाय परेश रावलही आपल्या कॉमेडीने लोकांना हसवणार आहे.

Whats_app_banner