मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  प्रेमकहाणी की भयानक गुन्ह्याचा उलगडा? 'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून उलगडणार मोठं कोडं! ‘या’ दिवशी होणार रिलीज

प्रेमकहाणी की भयानक गुन्ह्याचा उलगडा? 'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून उलगडणार मोठं कोडं! ‘या’ दिवशी होणार रिलीज

May 27, 2024, 02:00 PM IST

  • प्रेम कहाणी सोबतच सध्याच्या दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणारं कथानक असलेला 'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट सध्या चर्चेत आहे.

प्रेमकहाणी की भयानक गुन्ह्याचा उलगडा? 'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून उलगडणार मोठं कोडं!

प्रेम कहाणी सोबतच सध्याच्या दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणारं कथानक असलेला 'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट सध्या चर्चेत आहे.

  • प्रेम कहाणी सोबतच सध्याच्या दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणारं कथानक असलेला 'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट सध्या चर्चेत आहे.

प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणारं कथानक असलेला 'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर नंतर नुकताच, या चित्रपटातील गाण्याचा संगीत अनावरण सोहळा कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा झाला. येत्या ७ जूनला हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचे निर्माते फैरोज अनवर माजगावकर, हुसैन निराळे, श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून अनिल वहाने आणि सुनील यादव आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे यांचे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Rahat Fateh Ali khan : राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक; मात्र गायकाने व्हिडिओ शेअर करत वृत्त नाकारलं

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या निर्मात्यांवर आणि स्पर्धकांवर कारवाई करण्याची मागणी! नेमकं झालं तरी काय?

Dada Kondke: दादा कोंडके यांच्या चित्रपटांची ‘कलरफुल’ धमाल अनुभवा! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

Tharala Tar Mag: सायलीला पुन्हा दिसली प्रतिमा, पण यावेळी अर्जुनही विश्वास ठेवेना! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटातील प्रमुख कलाकार रत्नागिरीचे सुपुत्र फैरोज माजगावकर, हास्यजत्रा फेम अरुण कदम, संजय खापरे, अश्विनी कुलकर्णी, चैताली चव्हाण आणि दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांनी संगीत अनावरण सोहळ्या हजेरी लावली होती. तसेच, या संगीत अनावरण सोहळ्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संगीत दिग्दर्शक ऍलेन के पी, गायिका साक्षी होळकर, महादेव अशोक चाकणकर, राजेश बिडवे, ‘मन’ या हिंदी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक संजीव राठोड, सुहास खामकर, कस्टम ऑफिसर थिरू, उद्योगपती दीपक परमार, वर्षा कापडे, अशोक जाधव, निलेश पुण्यार्थी, प्रसिद्ध उद्योगपती मालेगाव (नाशिक) विजय सुखलाल चव्हाण अशा अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

कान्समध्ये ग्रँड प्रिक्सवर मोहोर उमटवणारी पायल कपाडिया आहे कोण? काय आहेत तिच्यावर आरोप?

चित्रपटात असणार धमाल गीते!

या चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची तीन गीते आहेत. ‘जगून घेतो आज’ मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला मंगेश बोरगावकर याने स्वरसाज दिला आहे. ‘डोन्ट वरी’ या स्फूर्तीदायक गीताला गायिका साक्षी होळकरचा आवाज लाभला आहे. तर ‘राऊडी रजनी डान्स’ हे जोशपूर्ण गाणं ऍलेन के पी आणि बंदना दत्ताने गायलं आहे. संजय नवगिरे आणि प्रशांत जामदार यांनी ही गीते लिहिली आहेत. या चित्रपटातील पहिल ‘राऊडी रजनी डान्स’ हे गाण सोशल मीडियावर नुकतच प्रदर्शित झाल आहे. तसेच या चित्रपटातील इतर गाण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. मात्र चित्रपटाच्या कथेत काय रहस्य दडलं आहे? हे पाहाण औत्सुक्याच ठरेल. येत्या ७ जूनला चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज होणार आहे.

प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे न्यायचीच असेल तर जाऊदे; नावाच्या मुद्द्यावरून आस्ताद काळे कडाडला!

कोण कोण झळकणार?

गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी, प्रस्तुतकर्ते एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स आणि एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे फैरोज अनवर माजगावकर, अमजद हुसैन निराळे, श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून अनिल वहाने आणि सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर, रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्याच बरोबर पटकथेची देखील जबाबदारी श्री रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी निभावली आहे. अभिनेता संजय खापरे, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, अभिनेता अरुण कदम, अभिनेता अभिजित चव्हाण, अभिनेता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसेल.

पुढील बातम्या