मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Madha lok Sabha : शरद पवारांनी महायुतीचा डाव उलटवला! सोलापुरात दिग्गज मोहरा फोडला

Madha lok Sabha : शरद पवारांनी महायुतीचा डाव उलटवला! सोलापुरात दिग्गज मोहरा फोडला

Mar 27, 2024, 04:44 PM IST

  • Vijaysinh Mohite Patil to join NCP SP : माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना आपल्या गोटात खेचून महाविकास आघाडीला धक्का देणाऱ्या महायुतीला शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवारांनी महायुतीचा डाव उलटवला! सोलापुरात दिग्गज मोहरा फोडला

Vijaysinh Mohite Patil to join NCP SP : माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना आपल्या गोटात खेचून महाविकास आघाडीला धक्का देणाऱ्या महायुतीला शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Vijaysinh Mohite Patil to join NCP SP : माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना आपल्या गोटात खेचून महाविकास आघाडीला धक्का देणाऱ्या महायुतीला शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Madha Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे मतदान जसजसे जवळ येत आहे, तसतशी राजकीय डावपेचांना धार आली आहे. महादेव जानकर यांना आपल्या गोटात खेचून महायुतीनं टाकलेला डाव शरद पवार यांनी उधळून लावला आहे. शरद पवार यांनी भाजपचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनाच गळाला लावलं आहे. मोहिते पाटील हे लवकरच पवारांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Kanhaiya Kumar: प्रचारादरम्यान कन्हैया कुमारवर हल्ला; पुष्पहार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने कानशिलात लगावली!

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना; अन् शरद पवार यांच्याबाबत म्हणाले...

Raebareli : माझ्या मुलाला तुमच्याकडं सोपवतेय, त्याला प्रेम द्या; तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही - सोनिया गांधी

Mumbai North Loksabha: उत्तर मुंबई मतदारसंघ ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी; मीच जायंट किलर ठरणार: भूषण पाटील

महायुतीमध्ये लोकसभेच्या ज्या जागांवरून वाद सुरू होते, त्यात माढ्याची जागा प्रमुख होती. तिथं भाजपनं रणजित निंबाळकरांना पुन्हा संधी दिली आहे. निंबाळकरांच्या उमेदवारीमुळं अकलूजमधील दिग्गज पुढारी मोहिते पाटील हे कमालीचे नाराज झाले होते. निंबाळकरांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, पक्षानं त्याकडं दुर्लक्ष केलं.

हा वाद सुरू असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महादेव जानकर यांना माढ्यातून उतरवण्याची तयारी केली होती. मोहिते-पाटील आणि निंबाळकर यांच्या वादाचा फायदा घेत आणि माढ्यातील धनगर मतं घेत खेचून ही जागा काढण्याचा शरद पवारांचा प्रयत्न होता. मात्र, महायुतीनं रातोरात जानकर यांना गळाला लावलं. त्यामुळं पवारांच्या पक्षावर नव्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ आली होती.

धैर्यशील मोहिते-पाटलांचा मार्ग मोकळा होणार

हा शोध घेत अखेर मोहिते पाटलांपाशी येऊन थांबला आहे. पवारांच्या पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी नुकतीच मोहिते पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत माढ्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. कोल्हे यांनी पवारांचा निरोप मोहिते पाटलांना दिला. पवारांच्या पक्षात गेल्यास धैर्यशील मोहिते पाटलांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणं सहज शक्य होईल हे मोहिते-पाटलांच्या लक्षात आलं आणि तिथंच पक्षांतरावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं.

उद्याच्या बैठकीत ठरणार प्रवेशाचा मुहूर्त

विजयसिंह मोहिते पाटील हे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींची उद्या मुंबईत बैठक होणार असून त्यानंतर दोन-चार दिवसांत प्रवेश होणार आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी ही माहिती दिली. तसं झाल्यास धैर्यशील मोहिते-पाटील हे माढ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे निश्चित मानलं जात आहे.

कोण आहेत मोहिते-पाटील?

विजयसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. शरद पवारांच्या विश्वासातील म्हणून ते ओळखले जात होते. अकलूज तालुक्यासह सोलापूरच्या काही भागांत मोहिते-पाटील घराण्याचा मोठा दबदबा आहे. राज्यात व केंद्रात २०१४ साली सत्ताबदल झाल्यानंतर ते भाजपमध्ये गेले होते. आता पुन्हा एकदा ते मूळ पक्षात परतणार आहेत. त्यांच्या पक्षांतरानं माढ्यातील राजकीय गणितं पुन्हा बदलणार आहेत.

पुढील बातम्या