मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Gudi Padwa 2024: हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा कसा असणार १२ राशींसाठी? वाचा तुमचं राशीभविष्य

Gudi Padwa 2024: हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा कसा असणार १२ राशींसाठी? वाचा तुमचं राशीभविष्य

Apr 04, 2024, 02:01 PM IST

  • Hindu Nav Varsh Gudhi Padwa Rashifal 2024: यंदा हिंदू नववर्ष विक्रम संवत २०८१ सुरू होईल. या नवीन वर्षाचा राजा मंगळ आणि मंत्री शनी आहे. जाणून घ्या १२ राशींसाठी कसं असणार हे हिंदू नववर्ष...

हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा कसा असणार १२ राशींसाठी? वाचा तुमचं राशीभविष्य

Hindu Nav Varsh Gudhi Padwa Rashifal 2024: यंदा हिंदू नववर्ष विक्रम संवत २०८१ सुरू होईल. या नवीन वर्षाचा राजा मंगळ आणि मंत्री शनी आहे. जाणून घ्या १२ राशींसाठी कसं असणार हे हिंदू नववर्ष...

  • Hindu Nav Varsh Gudhi Padwa Rashifal 2024: यंदा हिंदू नववर्ष विक्रम संवत २०८१ सुरू होईल. या नवीन वर्षाचा राजा मंगळ आणि मंत्री शनी आहे. जाणून घ्या १२ राशींसाठी कसं असणार हे हिंदू नववर्ष...

Hindu Nav Varsh Gudhi Padwa Rashifal 2024: हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा तिथीपासून सुरू होते. इंग्रजी कॅलेंडरनुसार ते यंदा मंगळवार, ९ एप्रिल २०२४पासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत २०८१ सुरू होईल. या नवीन वर्षाचा राजा मंगळ आणि मंत्री शनी आहे. जाणून घ्या १२ राशींसाठी कसं असणार हे हिंदू नववर्ष... 

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : षडाष्टक योगात शु्क्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 17, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : सीता नवमीचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 16, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : बुधाष्टमीला कोण-कोणत्या राशीच्या व्यक्तिंवर राहील देवीची खास कृपा! वाचा राशीभविष्य

May 15, 2024 04:00 AM

Budh Gochar : बुध ग्रहाचे मेष राशीत संक्रमण; या ३ राशींसाठी उत्तम प्रगतीचा काळ, सर्व प्रयत्न यशस्वी होतील

May 14, 2024 12:12 PM

Rashi Bhavishya Today : गंगा सप्तमीचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 14, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : पुष्य नक्षत्रात आजचा सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 13, 2024 04:00 AM

मेष: तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा या वर्षाचा राजा आहे. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभ असणार आहे. कारण गुरूच्या शुभ स्थितीमुळे तुम्हाला फायदा होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. यावर्षी तुम्हाला गुरु आणि मंगळाकडून खास भेट मिळणार आहे. तुम्ही नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता.

वृषभ: तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र शनीला अनुकूल आहे. शनी या वर्षाचा मंत्री आहे. त्यामुळे नवीन वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या राशीत गुरुचे भ्रमण होणार आहे, यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल. धार्मिक कार्यात अधिक लक्ष द्याल. तुम्हाला शनी आणि गुरूकडून विशेष भेटही मिळू शकते. तुम्ही एखादी महागडी वस्तू किंवा कार खरेदी करू शकता.

मिथुन: नवीन वर्ष विक्रम संवत २०८१ हे तुमच्या राशीसाठी शुभ ठरू शकते. हे हिंदू नववर्ष जीवनात सुख समृद्धी घेऊन येईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजात मानसन्मान वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.

कर्क: तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे. सोमवारपासून प्रतिपदा तिथी सुरू होत, असून तुमच्या राशीवर शनीचा प्रभाव असणार आहे. मात्र, नवीन वर्षात तुम्हाला या प्रभावापासून थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. शनीसोबत चंद्राची युती तुमच्यासाठी यशाचा नवीन मार्ग उघडेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून एखादी विशेष भेट मिळू शकते.

Horoscope Today 4 April 2024 : आजचा गुरुवार ठरेल ध्येयपूर्तीचा! मेष ते मीन सर्व राशींचे वाचा भविष्य!

सिंह: हे नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी संमिश्र परिणाम देणारे असणार आहे. नोकरीत सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या: येणारे नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी संमिश्र परिणाम देणारे आहे. यावर्षी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शनी देवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या नोकरीत सकारात्मक परिणाम दिसून येतील. जर, तुम्ही व्यावसायिक असाल, तर तुम्हाला काळजीपूर्वक कामे करावे लागतील. राहू आणि केतूच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात अडचणी वाढतील.

तूळ: या राशीसाठी हिंदू नवीन वर्ष शुभ असणार आहे. कारण गुरु तुमच्या लाभाच्या घराच्या स्थित आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नशीब तुमच्या बाजूने असेल. त्यामुळे तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल आणि तुम्ही शेअर बाजार, लॉटरीमध्ये ही नफा मिळवू शकता. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात बदलासाठी प्रयत्न करत असाल, तर यश मिळेल.

वृश्चिक: विक्रम संवत २०८१ तुमच्यासाठी आर्थिक अडचणी दूर करेल, ज्यामुळे भौतिक सुखाचा लाभ घेता येईल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवता येईल. मंगळ हा या वर्षाचा राजा असल्याने नोकरीत असाल, तर बढतीची शक्यता आहे. जर, तुम्ही व्यवसायिक असाल तर, तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार एप्रिल महिन्याचा तिसरा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

धनु: हिंदू नववर्ष २०८१ तुमच्या राशीसाठी खूप सकारात्मक सिद्ध होईल. नोकरी आणि करिअरमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वैवाहिक जीवन सुधारेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. लांबच्या प्रवासाला जाता येईल.

मकर: लोकांशी तुमचे असलेले संबंध यावर्षी सुधारतील. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील. मानसन्मानात वाढ होईल. सुख शांती मिळेल. आर्थिक प्रश्न सुटतील. गुंतवणुकीतून लाभ होईल. नोकरीत जपून काम करावे लागेल.

कुंभ: तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी या वर्षाचा मंत्री आहे. या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राजपद आणि शनीचे मंत्रीपद लाभदायक ठरणार आहे. शनीदेवाच्या विशेष आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडणार आहे. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

मीन: मंगळ तुमच्या राशीसाठी उपयुक्त ठरू शकतो. त्याच्या प्रभावामुळे नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येतील. धार्मिक प्रवासाचीही शक्यता आहे. तब्येत सुधारेल. तुम्हाला तुमचा जोडीदार आणि भाऊ यांच्याकडून सहकार्य मिळेल. 

पुढील बातम्या