मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 4 April 2024 : आजचा गुरुवार ठरेल ध्येयपूर्तीचा! मेष ते मीन सर्व राशींचे वाचा भविष्य!

Horoscope Today 4 April 2024 : आजचा गुरुवार ठरेल ध्येयपूर्तीचा! मेष ते मीन सर्व राशींचे वाचा भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 04, 2024 12:58 PM IST

Horoscope Today 4 April 2024 : आज ४ एप्रिल २०२४ गुरुवार रोजी, दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, दिवस शुभ राहील की अशुभ, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

आजचे राशीभविष्य ४ एप्रिल २०२४
आजचे राशीभविष्य ४ एप्रिल २०२४

आज गुरुवार ४ एप्रिल रोजी, दशमीचा चंद्र मकर राशीत भ्रमण करत आहे. बव करणात व सिद्ध योगात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष: 

आज आत्मविश्वास वाढेल. उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील.

वृषभ: 

आज वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणी कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसांपासून अडलेली ऑर्डर हातात पडेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. संवाद वाढेल आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. रोजगारात आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सामंजस्य राहील. घर वाहन खरेदीचा योग आहे.

मिथुन: 

आज अडकलेले पैसे हातात पडतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. परदेश प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. घरामध्ये तरुण वर्गाची येजा राहील. तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल. परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. बढतीचे योग आहे. 

कर्कः 

आज अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक घडी बसेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी व संधी मिळेल. 

सिंहः 

आज तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून राहावे. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. मानसिक स्वास्थ राखा.

कन्या: 

आज आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. यश मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या.

तूळ: 

आज अडचणी उद्भवतील. मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. योग्यवेळी समज द्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका.

वृश्चिक: 

आज माणसाच्या गूढ वागण्याचा थोडा त्रासच होणार आहे. कोणालाही जामीन राहू नये. मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडा उद्धटपणा आणि अतिशयोक्ती टाळा. कार्यक्षेत्रात मितभाषी राहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. मन लावून काम करा.

धनुः 

आज लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करिअरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. संधी दार ठोठावून निघून जाण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते.

मकरः 

आज उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे असाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कौटुंबिक सुखशांती आनंददायक वातावरण राहील. आर्थिक सहकार्य लाभेल.

कुंभ: 

आज काम करवून घ्याल. अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे. मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. मनोधैर्य उंचावेल. 

मीनः 

आज आनंदी उत्साही राहाल. सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढती मिळेल. धावपळ फायदेशीर राहील. रोजगारात नवीन योजना राबवाल. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी राहाल. 

WhatsApp channel