मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रहांचा राजा कोण असेल?, कसं असेल मंत्रिमंडळ?, कोणत्या राशींना होणार लाभ?

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रहांचा राजा कोण असेल?, कसं असेल मंत्रिमंडळ?, कोणत्या राशींना होणार लाभ?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 20, 2023 12:09 PM IST

Gudhi Padwa 2023 Graha : गुढीपाडव्याला देशात किंवा जगात राष्ट्रपती किंवा पंतप्रधान कोण असतील हे जरी आपण एका फटक्यात सांगू शकत असलो तरी गुढी पाडव्याची घोषणा कोणता ग्रह करेल. कोण राजा असेल आणि कोण सेनापतीची धुरा आपल्या खांद्यावर वाहावेल हे पाहूया.

गुढी पाडव्याला कसं असेल ग्रहांचं मंत्रिमंडळ
गुढी पाडव्याला कसं असेल ग्रहांचं मंत्रिमंडळ (हिंदुस्तान टाइम्स)

नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा २२ मार्च २०२३ पासून सुरू होत आहे. अशात विक्रम संवत २०८०ला प्रारंभ होईल. या नववर्षात ग्रहांची स्थिती काय असेल कोणता ग्रह नव्या वर्षाचा राजा असेल, कोणता ग्रह नव्या वर्षाचं स्वागत करेलं आणि गोण नव्यावर्षाचा सेनापती म्हणून ओळखला जाईल याची रंजक माहिती आपण करून घेणार आहोत.

कसं असेल ग्रहांचं मंत्रिमंडळ

हिंदू नववर्ष विक्रम संवत २०८० चा सूर्योदय शनीच्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात होईल. संवतचा मंत्री शुक्र असल्याने या वर्षी आंतराष्ट्रीय स्तरावर महिलांचा प्रभाव जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. आता कोण राज म्हणून सूत्र होती घेणार आणि कोणाचा त्या मंत्रिमंडळात समावेश असेल हेही पाहूया.

विक्रम संवत २०८०चा कोण असेल राज आणि कोण असतील मंत्री 

संवत वर्षात बुध राजा असेल आणि शुक्रदेव त्यांचा मंत्री असेल, शुक्रदेव सेनापतीची जबाबदारी घेतील. देव गुरु बृहस्पती बुधवार, २२ मार्च रोजी हिंदू नववर्षाची घोषणा करतील. फाल्गुन महिना संपल्यानंतर चैत्र महिना हा नवीन वर्षाचा पहिला महिना आहे. याला विक्रम संवतचे नवीन वर्ष म्हणूनही ओळखलं जातं.आणि संवत्सराची वाहने कोळसे व कोल्हे असतील. या विक्रम संवताचे नाव पिंगल असे असेल.

कसं असेल विक्रम संवत २०८० 

संवतचा राजा बुध असल्यामुळे व्यापारी वर्गाला त्यांच्या व्यवसायात प्रगती होईल. यादरम्यान कारागीर, लेखक आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ मिळत राहतील. या वर्षी संवतचा मंत्री शुक्र असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचा प्रभाव वाढणार आहे. यासोबतच फॅशन, फिल्म इंडस्ट्री, एंटरटेनमेंट या क्षेत्रात भारतासह जगभरातील ट्रेंड पाहायला मिळणार आहेत.

या संवताचा कोणत्या राशींना फायदा होईल.

संवत २०८० मध्ये मिथुन, सिंह, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

विभाग