Vaibhav Naik Video : 'भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्थानिक मराठी माणसांना डावलून गुजराती लोकांना पुढं आणलं जात आहे. व्यवसायानंतर आता राजकारणातही गुजराती लोक शिरकाव करत आहेत. मुंबईनंतर आता सिंधुदुर्ग गुजराती माणसाच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नारायण राणे हे त्यासाठी मदत करत आहेत,' असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे निवडणूक लढवत आहेत. नुकतीच राणे यांनी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतली. त्यावरून वैभव नाईक यांनी राणे व भाजपवर जोरदार टीका केली आहे.