मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : घराणेशाहीवर बोलणाऱ्या अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत सुनावले, म्हणाले…

Video : घराणेशाहीवर बोलणाऱ्या अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत सुनावले, म्हणाले…

Apr 16, 2024 12:42 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 16, 2024 12:42 PM IST

Uddhav Thackeray slams Amit Shah : शिवसेना पुत्र प्रेमामुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुत्री प्रेमामुळं फुटली अशी टीका करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. 'अमित शहा यांच्या पुत्र प्रेमामुळं भारत अंतिम सामना हरला त्याचं काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. अमित शहा यांचे चिरंजीव जय शाह हे बीसीसीआयचे सेक्रेटरी आहेत. त्यांना हे पद मिळाल्याबद्दल अनेकांनी शहांच्या घराणेशाहीवर बोट ठेवलं आहे. त्याच अनुषंगानं उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेना व राष्ट्रवादी का फुटली याची कारणं सांगताना तुमचे चेले-चपाटे काय बोलतात याकडंही लक्ष असू द्या. दोन पक्ष फोडून पुन्हा सत्तेत आलो, असं तुमचे एक चेले देवेंद्र फडणवीसच बोलले होते, याची आठवणही उद्धव यांनी शहांना करून दिली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp