Amravati Lok Sabha Election 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा या दाम्पत्यानं आज त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आनंदराव अडसूळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्याचं स्वागत केलं. राजकारणात कुणीही कायमचं शत्रू नसतं, असं वक्तव्य या भेटीनंतर अभिजित अडसूळ यांनी केलं. त्यामुळं अडसूळ पितापुत्र लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा प्रचार करणार का, याविषयी उत्सुकता आहे.