Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाची संयुक्त सभा १८ एप्रिल रोजी पार पडली. त्यावेळी अजित पवार यांनी सांगलीतून अपक्ष लढणारे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. सहकाराच्या बाबतीत एकेकाळी आम्ही सांगलीचं उदाहरण द्यायचो, पण आता काय अवस्था झाली आहे. वसंतदादांनी चांगले साखर कारखाने काढले. त्यांचं वाट्टोळं कुणी केलं. तुमच्यात कारखाना चालवायची धमक नाही. तुम्ही दुसऱ्याला चालवायला देता? तुम्हाला कारखाना चालवायला येत नाही आणि खासदार व्हायला निघालाय, असा सणसणीत टोला अजित पवार यांनी यावेळी हाणला.