Ajit Pawar taunt Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला जोर चढला आहे. राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजयींची लढत इथं होत आहे. बारामती इथं आज झालेल्या सभेत अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. गेल्या १५ वर्षांत खासदारानं जे काम केलंय, त्यापेक्षा जास्त काम पुढच्या पाच वर्षात होईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. पूर्वी आम्ही फक्त घास-घास घासायचो. आता आम्हीही दिल्लीत जातो. मोदी साहेबांची ओळख झाले. अदानी-अंबानींच्या ओळखी झाल्यात, असा टोलाही अजित पवार यांनी हाणला.