मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Aus vs NZ: आता कमालच झाली... ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने ५ षटकांत दिला एकच रन, २९ चेंडू टाकले निर्धाव

Aus vs NZ: आता कमालच झाली... ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने ५ षटकांत दिला एकच रन, २९ चेंडू टाकले निर्धाव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 08, 2022 08:28 PM IST

SEAN ABBOTT Aus vs NZ: न्यूझीलंडचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. यजमान कांगारू संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात ऑसी गोलंदाज शॉन अॅबॉटने ५ षटकात फक्त एक धाव दिली. म्हणजेच २९ चेंडूंवर किवी फलंदाजाला एकही धाव करता आली नाही. त्याने २ विकेट्सही घेतल्या.

SEAN ABBOTT
SEAN ABBOTT

न्यूझीलंड विरुद्धच्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मंगळवारी दुसऱ्या सामन्यात कांगारू संघाने न्यूझीलंडचा ११३ धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाने ९ गड्यांच्या मोबदल्यात १९५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ३३ षटकांत ८२ धावांवर गारद झाला.

ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज शॉन अॅबॉटने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ५ षटकात फक्त एक धाव दिली. म्हणजेच २९ चेंडूंवर किवी फलंदाजाला एकही धाव करता आली नाही. त्याने २ विकेट्सही घेतल्या. आयपीएल २०२२ मध्ये तो सनरायझर्स हैदराबादचा भाग होता.

३० वर्षीय शॉन अॅबॉटने ९ व्या षटकात न्यूझीलंड संघाला दुहेरी धक्का दिला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने डेव्हॉन कॉनवेला बाद केले. त्याने २० चेंडूत ५ धावा केल्या. त्यानंतर ५ व्या चेंडूवर टॉम लॅथमला बाद केले. लॅथमला ३ चेंडूत खातेही उघडता आले नाही. याशिवाय लेगस्पिनर अॅडम झाम्पानेही शानदार गोलंदाजी केली. त्याने ९ षटकात ३५ धावा देत ५ बळी घेतले.

शॉन अॅबॉटने आयपीएलमध्ये खेळलेत ३ सामने

आयपीएल २०२२ मध्ये शॉन अॅबॉटला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने ४ षटकात ४७ धावा देत एक विकेट घेतली होती. त्याचबरोबर त्याने २०१५ मध्येही केवळ २ सामने खेळले होते. त्यावेळी त्याला एकही विकेट घेता आली नाही. एकूण T-20 कारकिर्दी बद्दल बोलायचे झाले तर त्याने ११५ सामन्यात १४२ विकेट घेतल्या आहेत. १६ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच, त्याने ऑस्ट्रेलियाकडून ८ टी-20 सामन्यांमध्ये ५ विकेट घेतल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर शॉन अॅबॉटने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. या दरम्याने त्याने 5 विकेट घेतल्या आहेत. सोबत त्याने ६६ प्रथम श्रेणी सामन्यात १८० विकेट घेतल्या आहेत. ४७ धावांत ७ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या