मराठी बातम्या  /  religion  /  Shree Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीचे शुभ मुहूर्त कोणते?
माघी गणेश २०२३
माघी गणेश २०२३ (हिंदुस्तान टाइम्स)

Shree Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीचे शुभ मुहूर्त कोणते?

23 January 2023, 7:30 ISTDilip Ramchandra Vaze

Time & Pooja Muhurta Of Shree Ganesh Jayanti 25 January 2023 : याला गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. दक्षिण भारतीय मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता.

माघी गणेश २०२३

ट्रेंडिंग न्यूज

बुद्धीची देवता असणाऱ्या गणपती अर्थात गणरायांचा वाढदिवस संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा श्री गणेश जयंती २५ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे. अनेक जण या दिवशी आपल्या घरात गणरायांची स्थापना करतात. गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. याला गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. दक्षिण भारतीय मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र गणेशाची पूजा केली जाते. गणेश जयंतीच्या दिवशी व्रत आणि पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.या दिवशी जो गणरायांची प्रेमाने पूजा करतो त्याला वर्षभर शुभ फळ मिळते. चला तर मग जाणून घेऊया गणेश जयंतीची शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा पद्धती.

श्री गणेश जयंती २०२३ तारीख

या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी मंगळवार, २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३.२२ वाजता सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी, २५ जानेवारी २०२३, बुधवारी दुपारी १२.३४ वाजता संपेल. उदय तिथीनुसार यावेळी गणेश जयंती २५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे.

श्री गणेश जयंतीचे महत्त्व

गणेश ही बुद्धीची आणि शुभाची देवता आहे. त्याच्या कृपेने जीवनात शुभता येते, माणसाला अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. अशा स्थितीत गणेश जयंतीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना केल्याने तो प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांना शुभ आशीर्वाद देतो.

काय आहे श्री गणेश जयंती पूजन पद्धत

श्री गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान-ध्यान करून गणपती बाप्पाचे व्रत करावे.

दिवसाच्या शुभ मुहूर्तावर गणरायांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.

गंगाजलाने गणरायांना साष्टांग नमस्कार घालावा.

गणरायांना हळद-कुंकू आणि धूप-दीप दाखवावे.

गणपती बाप्पाला मोदक, लाडू, फुले, कुंकू, जानवं आणि २१ दुर्वा अर्पण करा.

नंतर संपूर्ण कुटुंबासह गणेशजींची आरती करा.

श्री गणेश जयंतीची शुभ वेळ

२५ जानेवारी रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११.२९ ते दुपारी १२.३४ पर्यंत शुभ मुहूर्त असेल. या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता.

विभाग