मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi marriage : लग्नाबद्दल राहुल गांधी पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले! म्हणाले, 'अशी' हवी मुलगी!

Rahul Gandhi marriage : लग्नाबद्दल राहुल गांधी पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले! म्हणाले, 'अशी' हवी मुलगी!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 29, 2022 12:35 PM IST

Rahul Gandhi marriage : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. उन, थंडी, वारा कशाचीही तमा न बाळगता ते ही यात्रा करत आहेत. राहुल गांधी यांच्या बाबत सर्वात चर्चिली जाणारी गोष्ट म्हणजे त्यांचे लग्न. त्यांना कशी मुलगी हवी आहे या बाबत त्यांनी एका वाहिनीला मुलाखत देतांना सांगितले आहे.

खासदार राहुल गांधी
खासदार राहुल गांधी

दिल्ली : कॉँग्रेसने नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत सहभागी आहे. या यात्रेमुळे ते नेहमी चर्चेत असतात. या सोबतच आता ते एका वेगळ्या बाबीमुळे चर्चेत आले आहेत. राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. त्यांना कशी मुलगी हवी आहे या बाबत त्यांनी स्वत: खुलासा केला आहे.

खासदार राहुल गांधी यांचे लग्न झालेले नाही. त्यामुळे ते कधी लग्न करणार असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्ननावर राहुल गांधी यांनी मौन सोडलं असून त्यांना लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे किंवा मुलीबद्दल त्यांच्या अपेक्षा काय आहे, या बाबद्दल खुलासा केला आहे. राहुल गांधी हे जोडीदाराबद्दल बोलतांना अशी अपेक्षा व्यक्त केली की, मला अशा जोडीदारासोबत राहायला आवडेल जिच्यामध्ये आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी या दोघींचेही गुण असतील. भारत जोडो यात्रेदरम्यान एका वृतवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारच्या विचारलेल्या प्रश्नचे उत्तर देतांना त्यांच्या अपेक्षा या व्यक्त केल्या.

राहुल गांधी पुढे म्हणाले, ती माझ्या आयुष्यातील प्रेम होती. ती माझी दुसरी आई होती. इंदिरा गांधींसारखे गुण असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडेल का, असे त्यांना विचारल्यावर राहुल म्हणाले, हा छान प्रश्न आहे. मला अशी मुलगी आवडेल जिच्यामध्ये माझ्या आजी आणि आईचे गुण असतील आणि आशा मुलीशी मला लग्न करायला आवडेल.

राहुल गांधी पुढे म्हणाले, माझ्याकडे स्वतःची कोणतीही कार नाही. परंतु माझ्या आईकडे एक कार आहे. मी लंडनमध्ये राहत असताना मी आरडी 350 बाईक चालवायचो. ती बाईक माझ्या आयुष्यातील प्रेम आहे. सोबतच मला सायकल चालवायला आवडते आणि एकदा लॅम्ब्रेटा (स्कूटर) आवडली होती, असे राहुल गांधी म्हणाले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग