मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Budget Session starts : राष्ट्रपती म्हणाल्या, २०४७ पर्यंत भारत आत्मनिर्भर बनवायचा आहे !

Budget Session starts : राष्ट्रपती म्हणाल्या, २०४७ पर्यंत भारत आत्मनिर्भर बनवायचा आहे !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 31, 2023 12:58 PM IST

Budget Session starts : संसदेत आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्यांदाच संसदेला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत याचा उल्लेख केला आहे.

Draupadi murmu, President of India  HT
Draupadi murmu, President of India HT

Budget Session starts : संसदेत आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्यांदाच संसदेला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत याचा उल्लेख केला आहे.

संसदेत आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्यांदाच संसदेला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "आपल्याला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे". ही २५ वर्षे आपल्या सर्वांसाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कर्तव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत.

१ तास 2 मिनिटे चाललेल्या आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतात प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार आहे. हे सरकार न घाबरता काम करत आहे. यासाठी त्यांनी सर्जिकल स्ट्राईक, दहशतवादावरील कठोरता, कलम ३७० आणि तिहेरी तलाकचा उल्लेख आवर्जून केला.

सरकारला सलग दोन संधी दिल्याबद्दल मुर्मू यांनी जनतेचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, आपल्याला एक असा आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे की जिथे गरिबी नाही आणि मध्यमवर्ग समृद्ध आहे. गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू ठेवण्याबाबतही त्यांनी सुतोवाच केले. त्यांनी ११ कोटी छोट्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी २.२५ लाख कोटी रुपयांच्या सन्मान निधीचाही उल्लेख केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- संसदेच्या या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना मला आनंद होत आहे. काही महिन्यांपूर्वीच देशाने आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण करून 'अमृतकाल'मध्ये प्रवेश केला. अमृतकालचा २५ वर्षांचा काळ हा स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ आहे.

- आपल्यासमोर एक युग निर्माण करण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला १०० टक्के क्षमतेने काम करावे लागेल. आपल्याला 2047 पर्यंत असे राष्ट्र घडवायचे आहे, ज्यात भूतकाळाचे वैभव आहे आणि आधुनिकतेचा प्रत्येक सुवर्ण अध्याय आहे. आपल्याला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. जो मानवी जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम आहे. तरुणांनी काळाच्या दोन पावले पुढे असले पाहिजे.

- सरकार काही महिन्यांत ९ वर्षे पूर्ण करेल. या ८ वर्षांत भारतातील जनतेने सकारात्मक बदल पाहिले. आज प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी आपण जगावर अवलंबून होतो, आज जगाचे प्रश्न सोडवत आहोत.

- आज जगाच्या पटलावर आपण आधुनिक पायाभूत सुविधा तयार करु शकतो. आज भारतात डिजिटल नेटवर्क आहे, ज्यातून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. त्यामुळे वेगवान विकासाच्या प्रगती पथावर भारताने पाऊल ठेवले आहे.

- जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेतून आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. येत्या २५ वर्षात विकसित भारताचा आत्मविश्वास वाढवणारा हा पाया आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग