मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Success Story of MRF : रस्त्यावर फुगे विकणाऱ्याची आज आहे ४६००० कोटींची कंपनी, एमआरएफचा टायर असा पळाला सुस्साट

Success Story of MRF : रस्त्यावर फुगे विकणाऱ्याची आज आहे ४६००० कोटींची कंपनी, एमआरएफचा टायर असा पळाला सुस्साट

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 26, 2023 03:40 PM IST

Success Story of MRF tyres : एमआरएफ कंपनीची यशोगाथा अत्यंत रोचक आहे. कंपनीचे संस्थापक के एम मैम्मेन मप्पिलाई एके काळी चेन्नईच्या रस्त्यावर फुगे विकत असत. आज त्यांच्याच एमआरएफच्या शेअर्सची किंमत १०९२६६.५० रुपये आहे. आता ही कंपनी सुखोईसाठीही टायर बनवते

MRF HT
MRF HT

Success Story of MRF tyres : टायर असावा तर एमआरएफचाच ! आजही देशात मोठ्या संख्येने लोक टायर खऱेदीसाठी पसंती दाखवतात. एमआरएफ आपल्या शेअऱ किंमतीबाबतही कायम चर्चेत असतो. एमआरएफचा एक शेअर १ लाख रूपयांच्या घरात आहे. पण या कंपनीच्या अस्तित्वाची कहाणी रोचक आहे. रस्स्त्यावर फुगे विकणाऱ्याने या कंपनीची स्थापना केली आहे.

फुग्यापासून ते टायरपर्यंतचा प्रवास

१९४६ मध्ये केरळमधील ख्रिश्चन कुटूंबात जन्मलेले के एम मैम्मेन मप्पिलाई चेन्नईच्या रस्त्यावर फुगे विकत होते. मैम्मेन मप्पिलाई यांची १० भावंडं होती. त्यावेळी त्यांना आपण भविष्यात ४६,३४१ कोटींची कंपनीची उभी करतील अशी कल्पना नव्हती. त्यांच्यासाठी १९५२ हे वर्ष टर्निंग पाँईंट ठरले. एक विदेशी कंपनी टायर रिट्रेडिंग प्रकल्पाला ट्रेड रबरचा पुरवठा करत असल्याचे त्यांनी पाहिले. हे पाहून त्यांच्या मनात बिझनेस आयडिया सुचली. भारतातच ट्रेड रबर बनवण्याचा प्रकल्प उभारण्याचा मानस त्यांनी निश्चित केला.

अशी झाली मद्रास रबर फॅक्ट्ररीची (एमआरएफ) सुरूवात

मैम्मेन यांना ही एक चांगली संधी वाटली. त्यांनी आपल्या सर्व बचतीतून ट्रेड रबर बनवण्याच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच एमआरएफचा जन्म झाला. ट्रेड रबर बनवणारी ही भारतातील पहिली कंपनी होती. त्यामुळे मैम्मेन यांची परदेशी कंपन्यांशी स्पर्धा होती. काही वेळातच त्यांचा व्यवसाय लोकप्रिय झाला. उच्च गुणवत्तेमुळे ४ वर्षांच्या आत कंपनीने ५० टक्के मार्केट शेअर मिळवले. त्यावेळी अनेक परदेशी कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला होता. ही संधी कंपनीच्या फायद्याचीच ठरली.

१९६० मध्ये टर्निंग पाँईंट

१९६० मध्ये मैमेन यांच्या आयुष्यात आणखीन एक टर्निंग पाँईंट आला. त्यांचा व्यवसाय चांगला चालत होता. पण त्यांना तो केवळ ट्रेड रबरपर्यंत सिमित ठेवायचा नव्हता. मैमेन यांची नजर टायर्सवर होती. एमआरएफ एक चांगला ब्रँड बनला होता आणि आता त्यांना टायर मार्केटमध्ये उतरायचे होते. कंपनीला आता परदेशी कंपनीचे सहाय्य हवे होते. त्यांनी अमेरिकेच्या मेन्सफिल्ड टायर कंपनीसोबत तांत्रिक सहाय्यासाठी करार केला. त्यानंतर त्यांनी टायर उत्पादन यूनिट्सची स्थापना केली. १९६१ साली एमआरएफचा पहिला टायर रस्त्यावर यशस्वीपणे धावला. त्याचवर्षी कंपनीने शेअर बाजारात आयपीओही आणला.

मसलमन झाला सज्ज

त्यावेळी भारतीय टायर उत्पादन उद्योगात डनलॉप, फायरस्टोन आणि गुडइयर सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व होते. MRF ने भारतीय रस्त्यांना साजेसे टायर बनवायला सुरुवात केली. तिरुवोटीयुरमध्ये तयार करण्यात आलेल्या रबर संशोधन केंद्राने कंपनीला यामध्ये मदत केली. यानंतरही एमआरएफ कंपनी थांबली नाही. चांगल्या मार्केटिंगमुळे कंपनीने टायर मार्केटमध्ये वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. एमआरएफ मसलमनचा जन्म १९६४ साली झाला, जाहीरातीमधून दिसणारा हा मसलमन कंपनीच्या टायर्सची ताकद दाखवतो.

सुखोईसाठीही बनवते टायर

एमआरएफने १९७३ मध्ये पहिले रेडियल टायर तयार केले. २००७ मध्ये पहिल्यांदाच एमआरएफने एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल करून विक्रम केला होता. पुढील ४ वर्षात व्यवसाय ४ पट वाढला. एमआरएफ सध्या विमान तसेच लढाऊ विमान सुखोईसाठी टायर बनवते. मद्रासच्या रस्त्यांवर फुगे विकून एवढं मोठं साम्राज्य उभ होईल याची कल्पनाही मैम्मेन यांनी केली नसेल.

WhatsApp channel

विभाग