Petrol Diesel price today 27 September 2023 : आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमधील वाढ थांबत नाहीये. आज ब्रेंट क्रुड ०.३३ टक्के वाढीसह ९४.२७ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर ट्रेड करत आहेत. तर डब्ल्यूटीआय क्रुड ०.३७ टक्के वाढीसह ९०.७२ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर ट्रेड करत आहेत.
त्यापार्श्वभूमीवर आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले जातात. जून २०१७ पूर्वी प्रत्येक १५ दिवसांनी दर जाहीर केले जात होते.
पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल ४२ पैशांनी तर डिझेल ३९ पैशांनी महागले आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ३२ आणि ३० पैशांनी महागले आहे. याशिवाय केरळ, जम्मू आणि काश्मीर, तामिळनाडू आणि तेलंगणासह इतर अनेक राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल १७ पैशांनी स्वस्त झालं आहे. हरियाणामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.
- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल १०३.०७ रुपये आणि डिझेल ९४.६६ रुपये प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.
संबंधित बातम्या