मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Google layoffs : सुंदर पिचाई यांनाच हाकला; गुगलमधील नोकर कपातीनंतर कर्मचाऱ्यांचा संताप

Google layoffs : सुंदर पिचाई यांनाच हाकला; गुगलमधील नोकर कपातीनंतर कर्मचाऱ्यांचा संताप

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 23, 2023 11:41 AM IST

Google layoffs : गुगलमध्ये नुकताच्या झालेल्या टाळेबंदीमुळे कर्मचाऱ्यांनी सोशल नेटवर्किंगवर संताप, रोष व्यक्त करायला सुरुवात केली आहे. संचालक मंडळाने सुंदर पिचाई यांचा काढून टाकावे अशी थेट मागणी या कर्मचाऱयांनी केली आहे.

Sunder Pichai_HT
Sunder Pichai_HT

Google layoffs : गुगलने अंदाजे १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या निर्णयामुळे टाळेबंदी झालेले कर्मचारी आणि बाहेरील तंत्रज्ञांना धक्का बसला आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील दिग्गज कंपनीच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी ते आता सोशल मीडियावर मोठ्या संख्येने व्यक्त होत आहेत.

टाळेबंदीच्या या निर्णयामुळे भावूक झालेल्या कर्मचाऱ्यांना सुंदर पिचाई यांनी ईमेल पाठवला होता. त्यामध्ये त्यांनी या निर्णयाबद्दल मला मनापासून खेद वाटतो आणि कंपनीच्या या संपूर्ण निर्णयाची जबाबदारी मी घेतो असे म्हटले होते.

या पत्रानंतर काही टेक लिडर्स आणि टाळेबंदी झालेले कर्मचारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केेल आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर पिचाई निर्णयासाठी जबाबदार असतील तर त्यांनीच त्यांचे पद पहिल्यांदा का नाही सोडले.

युव्हरडोस्ट अभियांत्रिकी संचालक विशाल सिंग म्हणाले की, जर त्यांनी चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्यासाठी तेच जबाबदार आहेत. मग सुंदर पिचाई गुगलमध्ये काम कसे करु शकतात. सिंग पुढे म्हणाले की, संचालक मंडळाने सुंदर पिचाई यांनाही कामावरुन काढून टाकावे. मायक्रोसाॅफ्टमध्ये सत्या नाडेला यांच्या बाबतीतही हीच धारणा आहे. कारण नाडेला यांनीही २०२३ मध्ये १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे.

सिंह म्हणाले की पिचाई आणि नाडेला यांना काही किंमत मोजावी लागेल.  कारण ते केवळ हा निर्णय कठीण असल्याचा ईमेल पाठवू शकत नाहीत. " हे बोलणे खूप सोप्पे आहे. पण त्यांनी त्यांच्या चुकीच्या निर्णयांची किंमत मोजावी.

२० जानेवारी रोजी, पिचाई यांनी गुगलच्या टाळेबंदीच्या निर्णयावर पाठवलेल्या ईमेलमध्ये सांगितले की, "एक कठीण निर्णय तुमच्यासोबत शेअर करणे अनिवार्य आहे. ते म्हणाले की कंपनीने १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे."मला त्याबद्दल मनापासून खेद वाटतो. या बदलांचा गुगलर्सच्या जीवनावर परिणाम होईल या वस्तुस्थितीची खंत माझ्यावर खूप जास्त आहे. ज्या निर्णयांमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहेत, त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो".

या निर्णयाने हैराण झालेल्या एका युजरने लिहिले की, जर गुगल हे करू शकत असेल तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवता येईल?

गुगलमध्ये प्रोग्रॅम मॅनेजर असलेल्या पुलकित पाहावा हिलादेखील कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. ती म्हणते की, असं वाटलं होत की, गुगल असे करणार नाही. पण त्यांनी केले. कालचा दिवस अविश्वासाचा दिवस होता. कारण ज्या लोकांसोबत अनेक वर्षे तुम्ही काम केले त्यांनाही कामावरुन कंपनीने काढून टाकले आहे.

अल्फाबेट वर्कर्स युनियन (एडब्ल्यूयू) ने देखील कंपनीच्या निर्णयावर टीका केली आहे. गेल्या तिमाहीत १७ अब्ज डाॅलर्सचा नफा कमावलेल्या कंपनीने हे पाऊल उचलणे अस्विकार्य आहे. अल्फाबेट ही गुगलची मूळ कंपनी आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग