मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Budget 2023 : अर्थमंत्री म्हणतात, मी मध्यमवर्गातूनच, मला मध्यमवर्गाच्या अडचणी समजतात!

Budget 2023 : अर्थमंत्री म्हणतात, मी मध्यमवर्गातूनच, मला मध्यमवर्गाच्या अडचणी समजतात!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 16, 2023 11:24 AM IST

Budget 2023 : मी मध्यमवर्गातूनच आहे, त्यामुळे मला मध्यमवर्गाच्या अपेक्षा समजतात, असे सुतोवाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. आरएसएसच्या साप्ताहिक पांजजन्यच्या अनावरणाप्रसंगी त्या बोलत होत्या.

Nirmala sitharaman_HT
Nirmala sitharaman_HT

Budget 2023 : मी मध्यमवर्गातूनच आहे, त्यामुळे मला मध्यमवर्गाच्या अपेक्षा समजतात, असे सुतोवाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. आरएसएसच्या साप्ताहिक पांजजन्यच्या अनावरणाप्रसंगी त्या बोलत होत्या. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.

अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता फक्त १५ दिवस बाकी असताना अर्थमंत्री म्हणाल्या की, मला मध्यमवर्गाच्या अडचणी समजतात, मी स्वत: सुद्धा मध्यमवर्गातून पुढे आले आहे. त्यामुळेच आतापर्यत सर्वसामान्यांवर मोठ्या कराचा कोणताही बोझा लादण्यात आलेला नाही. अर्थसंकल्पापूर्वी सरकार आयकर सीमा वाढवेल अशी अपेक्षा आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे २०२४ च्या निवडणूकीपूर्वी सादर होणारा हा यूपीए सरकारचा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प आहे.

नवा कोणताही कर नाही - अर्थमंत्री

आरएसएसद्वारे आयोजित समारंभात अर्थमंत्री म्हणाल्या की, मी स्वत: सुद्धा मध्यमवर्गातून आले आहे. वाढत्या महगाईमुळे त्यांच्यावर वाढणाऱ्या अडचणी मला समजतात. त्यामुळे मोदी सरकारने त्यांच्यावर कोणताही भार लादलेला नाही. वार्षिक ५ लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त आहे. भारतातील अर्थसंकल्प २०२३ सादर करताना जागतिक आर्थिक मंदी आणि युद्धजन्य परिस्थिती ही दोन प्रमुख आव्हाने आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रो रेल्वे आणि स्मार्ट सिटीबाबत वक्तव्य

सरकारने ईज आॅफ लिव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठी २७ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे नेटवर्क विकसित करणे आणि १०० स्मार्ट सिटीसारख्या योजनांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे प्राथमिक काम आगे. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने सरकारने आतापर्यंत चांगले काम केले आहे आणि यापुढेही कायम करत राहणार असल्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले.

भांडवली खर्चात सतत वाढ

२०२० पासून सरकारच्या भांडवली खर्चात वाढ होत आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात त्यात ३५ टक्के वाढ होऊन तोस ७.५ लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. कारण याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसतो.

बँकिंग क्षेत्रासंदर्भात ४ आर स्ट्रॅटेजी महत्त्वाची

बँकिंग क्षेत्रात ४ आर स्ट्रॅटेजी म्हणजेच रिक्गनिशन (मान्यता), रि कॅपिटलायझेशन (पूर्नभांडवलीकरण), रिझाॅल्यूशन (ठराव) आणि रिफाॅर्म (सुधारणा) महत्त्वाच्या आहेत. सरकारी बँकांसाठी याचा चांगलाच फायदा होत आहे. कारण यामुळे एनपीएमध्ये घसरण झाली आहे.

शेतकऱ्यांसाठी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटीबद्ध

शेतकऱ्यांच्या बाबतीत उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आजपर्यंत सरकारने यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

WhatsApp channel

विभाग