Adani group stocks : अदानी समुहाच्या या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट, आज तब्बल १७ टक्के वाढ
Adani group stocks : सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाला दिलेल्या क्लीन चीटचा परिणाम आज शेअर बाजारात अदानी समुहाच्या शेअर्सवरही दिसून आला. अदानी समुहाच्या या कंपनीचे शेअर्सचे भाव तब्बल दुप्पट वेगाने वर चढले. आज दिवसभरात शेअर्समध्ये १७ टक्के वाढ दिसून आली.
Adani group stocks : अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. सोमवारी सकाळी १० ते ७ कंपन्यां्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागले होते. सगळ्यात जास्त तेजी ही अदानी एन्टरप्राईजेस या कंपनीच्या शेअर्समध्ये दिसून आली. सकाळी कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्के अप्पर सर्किट लागले. तेंव्हा कंपनीच्या एका शेअर्सची किंमत २१५२.५५ रुपये प्रति शेअर्सच्या पातळीवर होती. या कंपनीचा शेअर्स दुपारी इंट्रा डेच्या दरम्यान १६.७३ टक्के तेजीसह २२८४.२० रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते.
ट्रेंडिंग न्यूज
११० दिवसात पैसे दुप्पट
२ फेब्रुवारी २०२३ ला अदानी एन्टरप्राईजेसच्या एका शेअर्सची किंमत १०१७.१० रुपये होती. आज हाच दर २३०४.२५ रुपयांच्या उच्चांकी पातळीला पोहोचली आहे. तेंव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ११० टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. या दरम्यान गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला आहे.
हिडेनबर्गच्या अहवालानंतर धडाम पडले शेअर्स
हिडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी एन्टरप्राईजेस कंपनीच्या शेअर्सलाही ग्रहण लागले. समुहातील सर्वच कंपन्यांच्या शेअर्सना उतरंडी लागली होती. २४ जानेवारी २०२३ ला अदानी एन्टरप्राईजेसच्या शेअर्सची किंमत ३४४२.७५ रुपये होती. आजच्या इंट्रा डे च्या उच्चांकी पातळीपेक्षा ११०० रुपयांपेक्षा अधिक आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये आलेल्या तेजीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपनी १० लाख कोटींचा आकडा पार केला आहे.
विभाग