मराठी बातम्या  /  धर्म  /  Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना कोणत्या दिशेला बसायला हवं? ध्यानात ठेवा 'या' गोष्टी

Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना कोणत्या दिशेला बसायला हवं? ध्यानात ठेवा 'या' गोष्टी

Aug 27, 2023, 11:23 PM IST

  • Raksha Bandhan 2023 : बहिण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

Raksha Bandhan 2023 Marathi Updates (Sanjeev Gupta)

Raksha Bandhan 2023 : बहिण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

  • Raksha Bandhan 2023 : बहिण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

Raksha Bandhan 2023 Marathi Updates : रक्षाबंधनाचा दिवस प्रत्येक भावा-बहिणीच्या आयुष्यातील खास दिवस असतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून सुरक्षेची हमी घेत असते. तसेच भावाला मोठं आयुष्य मिळण्यासाठी बहिणी देवाकडे प्रार्थना करते. याच दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून देत असतो. यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाचा सण ३० आणि ३१ ऑगस्टला येऊन ठेपला आहे. ३० ऑगस्टला राखी बांधण्यासाठी सकाळी ९ वाजताचा मुहूर्त अत्यंत योग्य आणि चांगला असल्याचं मानलं जात आहे. परंतु रक्षाबंधनाला राखी बांधत असताना कोमती काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

रक्षाबंधनाला कोणती काळजी घ्याल?

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधताना त्याचा मुहूर्त नक्कीच पाहायला हवा. तसेच राखी बांधत असताना भावाला चुकीच्या दिशेला बसवणं टाळावं. योग्य दिशेला बसून राखी बांधली गेली तर बहिण आणि भाऊ दोघांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल होण्यास मदत होत असते. त्यासाठी बहिणीचा चेहरा पश्चिम दिशेला तर भावाचा चेहरा पू्र्व दिशेला असायला हवा. याशिवाय राखी बांधत असताना ज्या दिशांना देवी-देवतांचा प्रभाव असतो, त्याच दिशेला बसून राखी बांधायला हवी. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला भावाला राखी बांधत असाल तर भावाचा चेहरा पूर्वेला आणि बहिणीचा पश्चिमेला असायला हवा. त्यामुळं दोघांच्या आयुष्यात सुख आणि शांती प्राप्त होत असते.

रक्षाबंधनाला राखी बांधत असताना घरातील देव्हाऱ्याच्या आसपास बसायला हवं. बेडरुममध्ये भावाला राखी बांधणं टाळायला हवं. याशिवाय राखी बांधताना आई-वडील आणि जवळचे नातेवाईक आसपास असायला हवेत. त्यामुळं कुटुंबातील प्रेम आणि जिव्हाळा वाढण्यास मदत होत असते. येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी या सर्व बाबींचं पालन केल्यास तुमच्या आयुष्यात रक्षाबंधनाच्या माध्यमातून सुख-प्राप्ती होऊ शकते. तसेच भाऊ आणि बहिणीला मोठं आयुष्य मिळते. याशिवाय मुहूर्त पाहून रक्षाबंधनाला राखी बांधल्यास भावा-बहिणीच्या कुटुंबात समृद्धी येत असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या